बॉलीवूडचा सुपस्टार म्हणून शाहरुख खानला ओळखले जाते. आपल्या अभिनयाच्या जोरावर शाहरुखने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. जगभरात शाहरुखचे लाखो चाहते आहेत. अभिनयाबरोबर शाहरुख त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असतो. २०२१ मध्ये शाहरुखचा मुलगा आर्यन खानला ड्रग्स केसप्रकरणी अटक करण्यात आली होती. नुकत्याच एका मुलाखतीत शाहरुखने पहिल्यांदा आर्यन खान अटकप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.

शाहरुख खानच्या पठाण’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या काही महिने आधीच आर्यन खानला ड्रग्स केस प्रकरणी अटक करण्यात करण्यात आली होती. या घटनेनंतर शाहरुख खानवर अनेक स्तरातून मोठ्या प्रमाणात टीकाही झाली. मात्र, त्यावेळी शाहरुख खान किंवा त्याचा परिवारातील कुणीच या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली नव्हती. शाहरुख खानला नुकतेच न्यूज १८ कडून एका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात शाहरुखने आर्यन खान ड्रग्स केसबाबात भाष्य केले आहे.

nagpur woman filed rape charges against future husband
तरुणीची भावी पतीविरुद्ध बलात्काराची तक्रार…साक्षगंध होताच……
IPL 2024 Kolkata Knight Riders vs Royal Challengers Banglore Match Updates in Marathi
IPL 2024: स्वप्नातही आरसीबीला हरवण्याचा विचार करणाऱ्या गंभीरनेच केलं विराटच्या संघाचं कौतुक, पाहा नेमकं काय म्हणाला
Solapur Murder wife, Solapur, Murder second wife,
सोलापूर : तीन घरांच्या दादल्यात आर्थिक कारणांवरून दुसऱ्या पत्नीचा खून, रक्ताने माखलेल्या चाकूसह पती पोलिसांत हजर
Hyderabad Inter-Faith Couple Attacked By Muslim
हैदराबादमध्ये आंतरधर्मीय जोडप्यावर हल्ला, VIDEO व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून कारवाई, ४ जण गजाआड

शाहरुख म्हणाला, “वैयक्तिक स्तरावरही माझ्या आयुष्यात काही त्रासदायक गोष्टी घडल्या आहेत; ज्यातून मी खूप काही शिकलो आहे. मला असं वाटतं की जेव्हा परिस्थिती अवघड असते तेव्हा माणसाने शांत राहावं आणि स्वतःची प्रतिष्ठा जपत काम करीत राहावं. कारण जेव्हा तुमच्या आयुष्यात सगळं चांगलं सुरू आहे, असं तुम्हाला वाटतं असतं तेव्हा अचानक तुम्ही जोरात जमिनीवर आपटले जाता आणि तुम्हाला कळतही नाही.”

शाहरुख पुढे म्हणाला, “गेल्या चार-पाच वर्षांत माझ्या व आणि माझ्या कुटुंबीयांच्या आयुष्यात खूप उलथापालथ झाली. कोविडमुळे माझ्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या. त्यावेळी माझे अनेक चित्रपट फ्लॉपही झाले होते, त्यानंतर अनेकांना शाहरुख खान संपला, असं वाटू लागलं होतं.”

हेही वाचा- ईशा देओल भेटल्यावर ‘अशी’ होती सावत्र आईची प्रतिक्रिया; आजारी काकांसाठी अभिनेत्री गेली होती सनी देओलच्या घरी

आर्यन खानला अटक का करण्यात आली होती?

शाहरुख खान आणि गौरी खान यांचा मुलगा आर्यन खान याला इतर सात जणांसह २ ऑक्टोबर २०२१ रोजी अटक करण्यात आली होती. मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणात आर्यनला अटक करण्यात आली होती. २ ऑक्टोबर २०२१ ला मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डिलिया क्रूझवर आर्यन खान गेला होता. या क्रूझ शिपवर सुरू असलेल्या पार्टीवर एनसीबीने छापा टाकला होता. या पार्टीत आर्यन खानही सहभागी झाला होता. एनसीबी मुंबईचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी आर्यन खानला अटक केली होती. त्यानंतर २९ ऑक्टोबर २०२१ पर्यंत आर्यन खान आर्थर रोड तुरुंगात होता. त्यानंतर आर्यनला २५ दिवसांनी जामीन मिळाला होता. त्यानंतर आर्यनला या प्रकरणी क्लीन चिटही मिळाली आहे.