शाहिद कपूर सध्या त्याच्या आगामी ‘ब्लडी डॅडी’ चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटात शाहिद नेहमीपेक्षा हटके भूमिका साकारणार आहे. सध्या अभिनेता ‘ब्लडी डॅडी’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून यासाठी शाहिद अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत आहे. अलीकडेच एका मुलाखतीत शाहिदने त्याची मुलं मीशा आणि झैनबाबत अनेक खुलासे केले आहे.

हेही वाचा : 72 Hoorain : दहशतवाद, ७२ कुमारिका मुली अन्…; ‘द केरला स्टोरी’ नंतर येणार ‘७२ हूरें’, टीझर प्रदर्शित

शाहिद म्हणाला, “मीशा आणि झैन या दोघांनाही मी माझे काम फारसे दाखवत नाही. अलीकडेच माझा ‘जब वी मेट’ चित्रपट कुटुंबासह आम्ही चित्रपटगृहात पाहिला हा मुलांनी पाहिलेला माझा पहिला चित्रपट आहे. मीराची इच्छा होती की, मुलांनी ‘जब वी मेट’ पाहावा कारण हा एकमेव चित्रपट आहे जिथे मी लोकांना मारत नाहीये आणि हा एक कौटुंबिक चित्रपट असल्याने चित्रपटगृहात जाऊन मुलांनी हा सिनेमा पाहिला.”

हेही वाचा : ‘फेव्हरेट गर्ल’ म्हणत रितेश देशमुखने बायकोबरोबर शेअर केला खास व्हिडीओ, नेटकरी म्हणाले “भावा आता रडवणार…”

शाहिद पुढे म्हणाला, “माझी दोन्ही मुलं चित्रपट पाहिल्यावर खूप उत्सुक होती पण, अनेक दिवसांपासून त्यांना कळत नव्हते एवढी लोकं माझ्याकडे का येत असतात? कारण, दोघांनी माझे फारसे काम पाहिले नव्हते आणि मला नाही वाटत त्यांनी माझे काम पाहावे मी त्यांच्यासाठी शाहिद कपूर नाहीये, मी त्यांच्यासाठी त्यांचा बाबा आहे.”

हेही वाचा : “मरमर, चिडचिड, रडरड हे शब्द…” सिद्धार्थ चांदेकरने शेअर केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत, नेटकरी म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इम्तियाज अली दिग्दर्शित ‘जब वी मेट’ चित्रपट २००७ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाने अनेकांची मने जिंकली आहेत आणि आजही शाहिद-करीनाचा हा चित्रपट सर्वांच्या पसंतीस उतरत आहे. फेब्रुवारीत ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने ‘जब वी मेट’ चित्रपटगृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित करण्यात आला होता. दरम्यान, शाहिदचा आगामी ‘ब्लडी डॅडी’ हा चित्रपट ९ जून रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ सिनेमावर रिलीज होणार आहे. या चित्रपटात शाहिदसोबत रोनित रॉय, संजय कपूर, राजीव खंडेलवाल, डायना पेंटी हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.