बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरने ‘कबीर सिंग’ या चित्रपटातून जबरदस्त कमबॅक केला. या चित्रपटानंतर शाहिदच्या फिल्मी करियरला एक वेगळंच वळण मिळालं. आता तो ओटीटी विश्वातही नशीब आजमावून बघत आहे. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘कबीर सिंग’ हा चित्रपट चांगलाच गाजला. दाक्षिणात्य चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’चा हा हिंदी रिमेक होता.

प्रेक्षकांनी हा चित्रपट डोक्यावर उचलून धरला, तर काही गोष्टींमुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यातही अडकला. या चित्रपटातील शाहिदची व्यक्तिरेखा ही दारू आणि सिगारेटच्या आधीन गेलेली आपल्याला पाहायला मिळाली. प्रेमभंगामुळे दारू व सिगारेटच्या नशेत हरवलेला कबीर सिंग शाहिदने अगदी उत्तम साकारला. या चित्रपटाचं चित्रीकरणादरम्यानचाच एक किस्सा शाहिदने सांगितला.

आणखी वाचा : पैशांसाठी नव्हे तर ‘या’ गोष्टीमुळे सोडली ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ मालिका; शैलेश लोढांनी प्रथमच दिलं स्पष्टीकरण

‘फिल्म कंपेनियन’शी संवाद साधतान शाहिदने सांगितलं की ‘कबीर सिंग’चं शूटिंग झालं की तो रोज चक्क २ तास आंघोळ करायचा. यामागील कारणही फार महत्त्वाचं आहे. याबद्दल शाहिद म्हणाला, “सेटवरुन जातान मी माझ्या व्हॅनमध्ये दोन तास आंघोळ करायचो कारण मी त्यावेळी सेटवर दोन सिगारेटची पाकीटं संपवायचो, त्यावेळी माझ्या अंगाला संपूर्ण निकोटीनचा वास यायचा, मी नुकताच तेव्हा बाबा झालो होतो अन् माझ्या लहान बाळाला याचा जराही वास येऊ नये यासाठी मी असं करायचो.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘कबीर सिंग’नंतर मात्र शाहिदने सिगारेट पूर्णपणे सोडल्याचंही स्पष्ट केलं. २०१६ मध्ये शाहिद व मीरा यांच्या पोटी मिशाचा जन्म झाला. सध्या शाहिद त्याच्या आगामी ‘नुरानी चेहेरा’ या चित्रपटावर काम करत आहे. याबरोबरच ‘जब वी मेट’च्या सीक्वलमुळेही शाहिद सध्या चांगलाच चर्चेत आहे.