अभिनेता शाहरुख खान जितका त्याच्या कामामुळे चर्चेत असतो तितकाच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही चर्चेत असतो. त्याच्या लाईफस्टाईल बद्दल प्रत्येकाच्या मनात एक कुतूहल असतं. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे त्याचा बंगला ‘मन्नत.’

शाहरुखचा बंगला हे आता मुंबईतील एक प्रेक्षणीय ठिकाण म्हणून ओळखलं जाऊ लागलं आहे. शाहरुखचे असंख्य चाहते देशाच्या किंवा जगाच्या कानाकोपऱ्यातून फक्त शाहरुख कुठे राहतो हे बघण्यासाठी त्याच्या बंगल्या बाहेर येतात आणि घराबाहेर फोटोही काढतात. शाहरुखचा बंगला ‘मन्नत’ हा प्रत्येकालाच आकर्षित करतो. पण आता या बंगल्याने एका वेगळ्याच कारणाने सगळ्यांचे लक्ष वेधलं आहे. ती गोष्ट म्हणजे या बंगल्याच्या नावाची पाटी.

आणखी वाचा : “चित्रपटात कोणाला घ्यायचं…”; परेश रावल यांनी ‘हेरा फेरी ३’च्या कास्टिंगवर केलं भाष्य

शाहरुखच्या बंगल्याला म्हणजे ‘मन्नत’ला नावाची नवीन पाटी लावण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी या बंगल्याच्या नावाची पाटी डागडुजीच्या कारणाने काढण्यात आली होती. पण आता त्या जागी एक नवीन पाटी लावण्यात आली आहे. याला ‘डायमंड नेमप्लेट’ असं चाहत्यांकडून म्हटलं जात आहे. कारण या नावाच्या पाटीमध्ये छोटेछोटे एलईडी लाइट्स लावले आहेत.

शाहरुख खानच्या बंगल्याच्या एंट्रन्स लूकमध्ये नावाच्या पाटीव्यतिरिक्त आणखीन एक मोठा बदल केला गेला आहे. या घराचे गेट बदलण्यात आले आहे. जुन्या गंज लागलेल्या गेटच्या जागी आता काळ्या आणि पांढऱ्या रंगाने रंगवलेले एक मोठे गेट लावण्यात आले आहे.

हेही वाचा : “माझे आगामी चित्रपट सुपरहिटच होणार कारण…”; शाहरुख खानने व्यक्त केला विश्वास

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाहरुख खानच्या एका फॅन पेजने या नावाच्या नवीन पाटीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट होताच काही मिनिटातच प्रचंड व्हायरल झाले आहेत. आता शाहरुख खानच्या घराप्रमाणेच त्याच्या घराच्या नावाची ही नवीन पाटीही सर्वांना आकर्षित करत आहे.