शाहरुख खानच्या जानेवारी २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पठाण’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. आता पुन्हा एकदा ‘जवान’ या चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख मोठ्या पडद्यावर येणार आहे. हा चित्रपट यापूर्वी २ जूनला प्रदर्शित होणार होता, परंतु काही कारणास्तव या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली असून, आता हा सिनेमा ७ सप्टेंबर २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलल्यावर शाहरुखने ट्विटरवर ‘आस्क एसआरके’ (#AskSRK)सेशन घेतले. या वेळी शाहरुखला चाहत्यांनी अनेक नवनवीन प्रश्न विचारले.

शाहरुखच्या एका चाहत्याने ‘आस्क एसआरके’ (#AskSRK) सेशनमध्ये शाहरुखला विचारले की, सर ‘जवान’ चित्रपटातील तुमची सहकलाकार नयनताराबद्दल एका शब्दात काय सांगाल? यावर त्याने उत्तर दिले की, “ती अतिशय प्रेमळ, खूप गोड आहे… तिच्यासोबत काम करणे ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे… #जवान,” असे शाहरुखने ट्वीट केले आहे.

हेही वाचा : ‘Rodies’च्या शूटिंगला ब्रेक! प्रिन्स नरुलाने रिया चक्रवर्तीला दिली धमकी, दोघांमध्ये टोकाचे वाद?

आस्क एसआरके (#AskSRK)सेशनमध्ये चाहत्यांनी शाहरुखला अतिशय भन्नाट आणि मजेशीर प्रश्न विचारले आहेत. या सेशनमध्ये शाहरुखने ‘जवान’ची रिलीज डेट पुढे का ढकलली? याबाबतही खुलासा केला आहे.

हेही वाचा : भर कार्यक्रमात प्रसिद्ध गायिकेची उडाली तारांबळ! बसण्यासाठी जागा सापडेना, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शाहरुखच्या ‘पठाण’ने २०२३ मध्ये आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई केली असून,’पठाण’चा रेकॉर्ड फक्त ‘जवान’सारखा चित्रपटच मोडू शकतो, असा शाहरुखच्या लाखो चाहत्यांचा अंदाज आहे. म्हणून बॉलीवूडमधील निर्मातेही सतर्क झाले आहेत आणि सप्टेंबरमधील अनेक चित्रपटांच्या रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्या आहेत. ‘जवान’ ७ सप्टेंबर रोजी गोकुळाष्टमीच्या लॉंग वीकेंडला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.