Video: शाहरुख खानची लेक अमिताभ बच्चन यांच्या नातवाला करतेय डेट? ‘त्या’ व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण

त्यांच्या एका कृतीमुळे त्या दोघांमधलं बॉंडिंग सध्या चर्चेत आलं आहे.

suhana agastya

बॉलिवूडच्या प्रसिद्ध स्टारकिड्सच्या यादीत सामील असलेली शाहरुख खानची मुलगी सुहाना खान कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. सध्या ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. तिच्या आयुष्यात काय सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी अनेकजण तिच्यावर लक्ष ठेऊन असतात. पण आता सुहानाचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा सुहाना खानबरोबर दिसत आहे आणि व्हिडीओमध्ये त्या दोघांमधलं बॉन्डिंग पाहिल्यानंतर चाहते त्यांच्याबद्दल चर्चा करू लागले आहेत.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

अलीकडेच सुहाना खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावरून समोर आला. या व्हिडीओमध्ये ती तान्या श्रॉफच्या वाढदिवसाच्या पार्टीतून बाहेर येताना दिसत आहे. तान्या ही सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीची खास मैत्रीण आहे.

आणखी वाचा : Video: “ही कोण…” सुहाना खानला मागे टाकत तिच्याबरोबरच्या ‘त्या’ व्यक्तीची चर्चा

या व्हिडीओमध्ये दिसत आहे की सुहानाने या पार्टीत ऑफ-शोल्डर गाऊन परिधान केला आहे. पार्टी झाल्यावर ती तिथून निघत असताना तान्या आणि अगस्त्य नंदा तिला गाडीपर्यंत सोडायला आले आणि अगस्त्यने अत्यंत काळजीने सुहानाला गाडीत बसवून दिलं. सुहाना गाडीत बसत असताना अगस्त्याने तिला फ्लाइंग किस दिली. अगस्त्य आणि सुहाना खानचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत. अगस्त्यने सुहानाला फ्लाइंग किस देणं हे सगळ्यांनाच अनपेक्षित असल्याने या व्हिडीओवर कमेंट करत ते एकमेकांना डेट करत आहेत का? अशा चर्चा करू लागले आहेत.

हेही वाचा : Video: शाहरुख खानच्या लेकीला नो मेकअप लूकमध्ये पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का, म्हणाले, “सुहाना तर…”

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुहाना खान, आर्यन खान, नव्या नवेली नंदा आणि अगस्त्य नंदा लहानपणापासून एकमेकांचे जवळचे मित्र आहेत आणि अनेक कार्यक्रमांना ते एकत्र दिसले आहेत. तर आता लवकरच सुहाना आणि अगस्त्य झोया अख्तरच्या ‘आर्चिस’ या चित्रपटातून एकत्र अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-03-2023 at 18:03 IST
Next Story
अजय देवगण, तब्बूचा ‘भोला’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यास सज्ज; पहिल्या दिवशी कमावणार ‘इतके’ कोटी
Exit mobile version