scorecardresearch

‘पठाण’ला मिळणारा प्रतिसाद पाहून भारावला शाहरुख खान, चाहत्यांना सक्सेस मंत्र देत म्हणाला…

आता शाहरुखने कमबॅकबद्दल एक ट्वीट केलं आहे, जे सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

pathan

२०२३ मधील बहुप्रतिक्षित चित्रपट ‘पठाण’ हा कालच सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच याबद्दल सर्वांच्या मनात प्रचंड उत्सुकता होती. या चित्रपटाला शाहरुखचे चाहते चित्रपटगृहात तुफान प्रतिसाद देताना दिसत आहेत. या चित्रपटाचे सर्व शो हाउसफुल होत आहेत. आता या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून खुद्द शाहरुख खानही भारावून गेला आहे. आता शाहरुखने कमबॅकबद्दल एक ट्वीट करत चाहत्यांना एक सक्सेस मंत्र दिला आहे. केलं आहे, जे सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

पठाण चित्रपटातून शाहरुख खानने चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून या चित्रपटाचे अनेक ठिकाणी शोही वाढवण्यात आले आहेत. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने जगभरातून १०० हून अधिक कोटींची कमाई केली. आता शाहरुखने एक कोट ट्विट करत यशस्वी होण्यासाठी खास टीप दिली आहे.

आणखी वाचा : “दादा, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती…”; ‘त्या’ पोस्टमुळे रितेश देशमुख ट्रोल

शाहरुखने १९९७ साली प्रदर्शित झालेल्या Gattaca चित्रपटातील डायलॉग ट्वीट केला. त्याने लिहिलं, “Gattaca चित्रपट – “मी परत येण्यासाठी काहीही शिल्लक ठेवलेलं नाही.” मला वाटतं आयुष्यही असंच असतं…तुमचं पुनरागमन तुम्हाला ठरवण्याची गरज नसते. तुम्हाला फक्त पुढे जायचं असतं. मागे परतू नका, प्रयत्न करत रहा आणि जे सुरू केलंय ते संपवा.” आता त्याचं हे ट्वीट खूपच चर्चेत आलं आहे. त्याच्या ट्वीटवर त्याचे चाहते भरभरून प्रतिक्रिया देत त्याचं कौतुक करत आहेत.

हेही वाचा : “आमच्या मुलीचं नाव तू ठेव,” चाहत्याच्या मागणीवर शाहरुख खानने दिलेलं उत्तर चर्चेत, म्हणाला…

दरम्यान, ‘पठाण’ या चित्रपटात शाहरुख खानबरोबर दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तर त्यांच्याबरोबरच या चित्रपटात सलमान खानचाही कॅमिओ आहे

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 18:28 IST