शाहरुख खान हा त्याच्या कामाबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत असतो. नेहमीच तो त्याच्या कृतीने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतो. त्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते अक्षरशः वेडे असतात. आता अशाच एका प्रसंगामुळे शाहरुख खानवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

किंग खान गेले काही दिवस ‘पठाण’ चित्रपटामुळे खूप चर्चेत होता आणि आताही या चित्रपटातील त्याच्या कामाची क्रेझ कमी झालेली नाही. तर आता त्याच्या आगामी ‘जवान’ चित्रपटाकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. फक्त भारतातच नाही तर जगभरात चाहतावर्ग पसरला आहे. अनेकदा त्याचे चाहत्यांबरोबरचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता नुकतेच त्याला विमानतळावर पाहण्यात आले. या वेळी त्याने एका चाहत्याला दिलेल्या वागणुकीमुळे तो ट्रोल होऊ लागला आहे.

आणखी वाचा : शाहरुख खानचा ‘कार’नामा! खरेदी केली नवी कोरी रोल्स रॉयस; किंमत वाचून व्हाल आवाक्

शाहरुख खान विमानतळावर दाखल होताच चाहत्यांनी त्याच्याभोवती गर्दी केली. या वेळी शाहरुखच्या एका चाहत्याने त्याच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. शाहरुखला मात्र ते काही आवडले नाही. त्याने त्या चाहत्याचा हात झटकून टाकला. तो व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. पण त्याचा हा पवित्रा पाहून नेटकऱ्यांनी त्याला खडेबोल सुनावले आहेत.

हेही वाचा : भव्य खोल्या, प्रायव्हेट मूव्ही थिएटर आणि…; ‘इतक्या’ कोटींचा आहे शाहरुख खानचा आलिशान मन्नत बंगला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ समोर येताच किंग खानवर नेटकरी प्रचंड टीका करीत आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट करीत लिहिले आहे, “‘पठाण’ हिट झाला म्हणून लगेच इतका माज दाखवतोस?” तर आणखी एकाने लिहिले आहे, “तुझे हे वागणे चुकीचे आहे.” आणखी एक नेटकरी म्हणाला, “हे सेलेब्रिटी मंडळी विसरतात की यांना सेलेब्रिटी कोणी बनवले.” आणखी एकाने लिहिले, “चाहते आहेत म्हणून तू आहेस.” त्यामुळे शाहरुख खानवर नेटकरी चांगलेच नाराज झालेले दिसत आहेत.