‘पठाण’च्या यशानंतर आता शाहरुख खान ‘जवान’ चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. त्याच्या या आगामी चित्रपटाकडे त्याचे चाहते अक्षरशः डोळे लावून बसले आहेत. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच याबद्दल सर्वत्र चर्चा होती. या चित्रपटातील शाहरुखच्या लूकचेही कौतुक करण्यात आले. तर आता या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये आणि टीझरमध्ये दिसणारा त्याचा लूक असा का आहे हे त्याने सांगितले.

शाहरुख खाननेने काल ट्विटरवर आस्क एसआरके (AskSRK) या सेशनच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांशी गप्पा मारल्या. या वेळी चाहत्यांनी त्याला विविध प्रश्न विचारले. शाहरुखनेदेखील त्यातील अनेक प्रश्नांना त्याच्या हटके शैलीत उत्तरे दिली. याच सेशनदरम्यान एका चाहत्याने त्याला- ” जवान चित्रपटामध्ये तुझ्या शरीरावर पट्ट्या का बांधल्या आहेत?” असा प्रश्न विचारला. त्यावर शाहरुखने दिलेले उत्तर खूप चर्चेत आहे.

आणखी वाचा : Jawan teaser: जबरदस्त व्हीएफएक्स, धमाकेदार ॲक्शन अन्…; शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाचा टीझर अखेर प्रदर्शित

‘जवान’ या चित्रपटाचे पोस्टर काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाले. त्यात शाहरुखच्या चेहऱ्यावर पट्ट्या बांधलेल्या दिसल्या. तर काल प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या टीझरमध्येदेखील शाहरुखच्या संपूर्ण शरीरावर पट्ट्या बांधलेल्या दिसत आहेत. त्यामुळे त्याच्या एका चाहत्याने त्याला विचारले, “जवान चित्रपटामध्ये तुझ्या संपूर्ण शरीरावर इतक्या पट्ट्या का बांधल्या आहेत?” त्यावर शाहरुख म्हणाला, “जंगलात शूटिंग करताना मला खूप डास चावत होते म्हणून.” आता या शाहरुखच्या उत्तरावर त्याचे चाहते विविध प्रतिक्रिया देत त्याच्या विनोदबुद्धीचे कौतुक करत आहेत.

हेही वाचा : Video: “‘पठाण’ हिट झाला म्हणून इतका माज…!” शाहरुख खानची ‘ती’ कृती पाहून नेटकरी नाराज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान शाहरुखचा हा आगामी चित्रपट ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर अभिनेत्री नयनतारा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेता विजय सेतुपती या चित्रपटामध्ये नकारात्मक भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाबद्दलची शाहरुखच्या चाहत्यांच्या मनातली उत्सुकता आता आणखीनच वाढली आहे.