बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा ‘जब तक है जान’ चित्रपट सगळ्यांनाच आठवत असेल. यश चोप्रांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटात शाहरुखबरोबर कतरिना कैफ आणि अनुष्का शर्माचीही मुख्य भूमिका होती. लव्ह ट्रॅंगलवर आधारित असणाऱ्या या चित्रपटातील तिघांच्या भूमिकेचे कौतुक करण्यात आलं होतं. मात्र, या चित्रपटात सगळ्यात जास्त चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे शाहरुखने कतरिनाला ऑनस्क्रिन केलेलं किस. त्या सीनमुळे अनेक चर्चांना उधाण आले होते.आता शाहरुखने तो सीन का केला यामागच्या कारणाचा खुलासा केला आहे.

हेही वाचा- Video : टायगर श्रॉफ- दिशा पाटनीमध्ये पुन्हा पॅचअप? व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी खूष, म्हणाले…

शाहरुख खानला कॅमेऱ्यासमोर कोणत्याही अभिनेत्रीला किस करणे फार विचित्र वाटतं होते. ऑन स्क्रिन कोणत्याही अभिनेत्रीला किस करणार नसल्याचा नियम शाहरुखने केला होता. मात्र, यश चोप्रांच्या ‘जब तक है जान’ या चित्रपटासाठी शाहरुखने आपला हा नियम मोडला. २०१२ मध्ये एका कार्यक्रमादरम्यान शाहरुख खानने ‘जब तक है जान’ मध्ये कतरिनाला किस करण्यामागचं काऱण सांगितल होतं.

हेही वाचा- Video : “मी मुलगा असते तर बरं झालं असतं”; प्रियांका चोप्राचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

शाहरुख म्हणाला, ” मी खूप प्रामाणिक आहे. आदित्य, यशजी आणि कतरिना यांना माहित होते की मी विचित्र आहे. मला समस्या होत्या आणि माझ्याबरोबर काम करणे सोपे नव्हते. ते माझ्या कुटुंबासारखे आहेत. पण नंतर त्या सर्वांनी एकत्र येऊन मला किसिंग सीन करायला लावला आणि त्यांनी माझ्यावर जबरदस्ती केली. तसेच, किसिंग सीन करण्यासाठी मला फीही दिली गेली.”

हेही वाचा- “मी आजही स्वतःला…; ‘बॉलीवूड’बाबत अरशद वारसीच्या विधानाने चर्चांना उधाण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाहरुखच्या वर्क्रफंटबाबत बोलायचं झालं तर त्याचा बहुचर्चित ‘जवान’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा प्रमुख भूमिका साकारणार आहे. जवान ७ सप्टेंबर २०२३ रोजी रिलीज होणार आहे. ‘पठाण’नंतर या शाहरुखचे चाहते आता या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.