बॉलिवूडमधील एकेकाळच्या लोकप्रिय जोडींपैकी एक म्हणजे शत्रूघ्न सिन्हा आणि रीना रॉय यांची जोडी होती. दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं, ते सात वर्षे रिलेशनशिपमध्ये होते, पण त्यांचं लग्न होऊ शकलं नाही. शत्रुघ्न सिन्हा यांनी पूनमशी लग्न केल्यानंतर रीना रॉय यांच्या आयुष्यात पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहसिन खानची एंट्री झाली. ८० च्या दशकात दोघांनी लग्न केलं आणि रीना त्याच्याबरोबर पाकिस्तानला गेल्या.

सोनाक्षी सिन्हा हुबेहुब तुमच्यासारखी का दिसते? यावर रीना रॉय यांनी सोडलं मौन, म्हणाल्या…

लग्नानंतर रीनाला जन्नत (आताचं नाव सनम) नावाची मुलगी झाली. मात्र काही काळानंतर त्यांच्या नात्यात दुरावा येऊ लागला आणि संबंध बिघडू लागले. त्यानंतर मोहसिनने रीना यांना घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं. रीना यांना मुलीची कस्टडी मिळाली नाही. त्यांनी आपली मुलगी परत मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण जन्नत मोहसीनकडेच राहिली. अशा कठीण काळात शत्रुघ्न सिन्हा रीना रॉयच्या मदतीसाठी पुढे आले होते.

“माझं नातं…” शत्रुघ्न सिन्हांनी रीना रॉयशी अफेअरवर दिलेलं उत्तर; लग्न न करण्याचं कारण सांगितलं

शत्रुघ्न सिन्हा हे पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती जनरल झियाउल हक यांच्या मुलीचे मित्र होते आणि त्यामुळेच ते त्यांच्या घरी जायचे. जेव्हा त्यांना रीना यांच्या अडचणीबद्दल कळालं, तेव्हा त्यांनी ही गोष्ट झियाउल हक यांना सांगितली, तसेच रीनाला आपल्या मुलीची कस्टडी मिळावी, अशी विनंती त्यांनी केली होती. झियाउल हक यांनी शत्रुघ्न सिन्हांची विनंती मान्य केली आणि जन्नतची कस्टडी रीना रॉय यांना दिली. त्यानंतर रीना यांनी लेकीला मुंबईत परत आणलं. आता या माय-लेकी मुंबईमध्ये अभिनय शिकवतात.

लग्नाच्या ६ वर्षांनंतर जावेद अख्तर पडलेले शबाना यांच्या प्रेमात, अफेअरबद्दल कळताच ‘अशी’ होती पहिल्या पत्नीची प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पूनमशी लग्न झाल्यानंतरही शत्रुघ्न सिन्हा यांच्या रीना रॉयसोबतच्या मैत्रीवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. पण, शत्रुघ्न सिन्हा त्याचा फार विचार करत नाहीत. रीना यांचे कुटुंबीय शत्रुघ्न सिन्हांच्या संपर्कात असतात. हे दोघेही बऱ्याचदा कार्यक्रमांमध्ये एकमेकांना भेटतात आणि मदत करतात.