अवघ्या १९ व्या वर्षी आपल्या करिअरची सुरुवात करणारी ‘कांटा लगा गर्ल’ शेफाली जरीवाला आता ४२ वर्षांची आहे. एका म्युझिक व्हिडीओतून शेफालीला तुफान लोकप्रियता मिळाली. सलमान खान, प्रियांका चोप्रा व अक्षय कुमार यांच्या ‘मुझसे शादी करोगी’ या चित्रपटात काम करणारी शेफाली सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती तिच्या बोल्ड फोटोंमुळे कायम चर्चेत असते.

शेफाली जरीवालाने २०१४ साली अभिनेता पराग त्यागीशी लग्न केलं. लग्न करण्यापूर्वी दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. या जोडप्याच्या लग्नाला ११ वर्षे झाली असून ते दोघे खूप आनंदी आहेत. दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जातात, तिथले फोटो व व्हिडीओ ते चाहत्यांबरोबर शेअर करत असतात.

शेफाली जरीवालाच्या लग्नाला ११ वर्षे झाली असली तरी तिला अद्याप बाळ नाही. पारस छाबराच्या शोमध्ये शेफाली जरीवालाला बाळाबद्दल विचारण्यात आलं. त्यावर ती म्हणाली, “मूल जन्माला कुणीली घालू शकतं, पण मला वाटतं की जगात अशी अनेक मुलं आहेत ज्यांना घराची गरज आहे, प्रेमाची गरज आहे. प्रत्येकजण आपल्या मुलांवर प्रेम करतो, पण जो दुसऱ्याच्या मुलाला आपल्या घरात आणतो आणि त्याचे पालनपोषण करतो तो सर्वात महान आहे. वयाच्या १२-१३ व्या वर्षी जेव्हा मला मूल दत्तक घेणं ही गोष्ट समजली तेव्हापासूनच माझ्या मनात मूल दत्तक घेण्याचा विचार आला होता.”

बाळ दत्तक घेण्याची प्रक्रिया खूप मोठी – शेफाली जरीवाला

शेफाली जरीवाला पुढे म्हणाली, “बाळ दत्तक घेण्याच्या निर्णयात तुम्हाला पती व तुमच्या कुटुंबियांचाही पूर्ण पाठिंबा असावा लागतो. आमच्या घरात मूल दत्तक घ्यायला सगळे तयार आहेत, पण मूल दत्तक घेण्याची प्रक्रिया इतकी मोठी असते की त्या काळात मुलं मोठी होतात. प्रत्येकाला लहान मूल हवं असतं. पराग आणि मी खूप दिवसांपासून मूल दत्तक घेण्याचा विचार करत होतो, पण ते शक्य होत नाहीये. दुसरं म्हणजे माझ्या आणि परागच्या वयात खूप अंतर आहे.”

पराग व शेफालीच्या वयातील अंतर

“माझ्या व माझ्या पतीच्या वयातील अंतरामुळे मला आई होण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. आम्ही सर्व प्रयत्न करून थकलो आहोत. आता वाटतं की जेव्हा देवाची इच्छा असेल तेव्हाच आमच्या घरी नवीन पाहुणा येईल,” असं शेफाली म्हणाली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेफाली जरीवाला ही ४२ वर्षांची असून तिचा पती पराग ४९ वर्षांचा आहे. दोघांच्या वयात सात वर्षांचे अंतर आहे. परागही अभिनेता असून त्याने ‘पवित्र रिश्ता’सह इतर अनेक मालिकांमध्ये काम केलंय.