बॉलीवूड अभिनेत्री शहनाज गिल ‘बिग बॉस-१३’मुळे चर्चेत आली. रिअ‍ॅलिटी शोजनंतर ‘किसी का भाई किसी की जान’, ‘थॅंक्यू फॉर कमिंग’ अशा अनेक चित्रपटांमध्ये शहनाज झळकली शहनाजने आपल्या करिअरची सुरुवात म्युझिक व्हिडीओने केली.

शहनाजने आतापर्यत अनेक म्युझिक व्हिडीओजमध्ये काम केलं आहे. आज (८ एप्रिल रोजी) शहनाजचा नवाकोरा म्युझिक व्हिडीओ ‘धुप लगदी’ प्रदर्शित झाला आहे. या म्युझिक व्हिडीओची खासियत अशी की, ‘धुप लगदी’ हे गाणं स्वत: शहनाजने गायलं आहे.

हेही वाचा… सिंगल आहेस का? असा प्रश्न विचारल्यावर टायगर श्रॉफ म्हणाला, “माझ्या आयुष्यात एकच दिशा…”

म्युझिक व्हिडीओच्या निमित्ताने या शुभकार्यासाठी शहनाज सिद्धिविनायकाच्या चरणी पोहोचली आहे. शहनाजचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शहनाजने सफेद रंगाचा ड्रेस आणि नारंगी रंगाची ओढणी परिधान केली होती. गणपती बाप्पाचा फोटो आणि लाल रंगाची शाल देऊन शहनाजचं स्वागत केलं गेलं. शहनाजने पापाराझींना मिठाईदेखील वाटली.

शहनाजच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. एकाने कमेंट करत लिहिलं, “शहनाज बॉलीवूडमधली खूप विनम्र अभिनेत्री आहे”. तर “देव तुला नेहमी आशीर्वाद देईल”, अशा कमेंट्स अनेकांनी केल्या आहेत. खूप जणांनी तिच्या नव्या म्युझिक व्हिडीओसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. शहनाजने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरदेखील सिद्धिविनायक मंदिरातील तिचा फोटो शेअर केला आहे. “गणपती बाप्पा मोरया” असं कॅप्शन या फोटोला शहनाजने दिलं आहे.

हेही वाचा… “१९२ किलोच्या रेसलरला उचललं अन्…”, अक्षय कुमारची झाली होती ‘अशी’ अवस्था; सांगितली ‘त्या’ चित्रपटाची आठवण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शहनाज गिल ‘सब फर्स्ट क्लास’ या चित्रपटात झळकणार आहे. बलविंदर सिंग दिग्दर्शित या चित्रपटात ‘फुकरा’ फेम वरुण शर्मादेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.