भारतीय चित्रपटसृष्टीत आजवर वेगवेगळे प्रयोग झाले आहेत. त्यापैकी १९८७ साली प्रदर्शित झालेला शेखर कपूर दिग्दर्शित ‘मिस्टर इंडिया’ हादेखील बॉलिवूडमधील एक धाडसी प्रयोगच होता. अदृश्य माणसाची गोष्ट पडद्यावर तितक्याच सहजतेने मांडणं हे त्या काळाच्या मानाने बरंच आव्हानात्मक होतं. त्यावेळी चित्रपटावर निर्माते बोनी कपूर यांचे बरेच पैसे लागले होते. या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी अनिल कपूर हे प्रचंड चिंताग्रस्त होते. याचा खुलासा नुकताच शेखर कपूर यांनी केला.

हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी होईल की नाही याची चिंता अनिल कपूर यांना सतावत होती. या चित्रपटाचे लेखन सलीम-जावेद यांनी केले होते तर बोनी कपूर व सूरींदर कपूर यांनी याची निर्मिती केली होती. शेखर कपूर यांचाही हा दिग्दर्शक म्हणून दूसराच चित्रपट होता. १९८३ च्या ‘मासूम’ या चित्रपटाचं दिग्दर्शन शेखर कपूर यांनी केलं होतं ज्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता.

man kidnapped and burnt to killed in gujarat over instagram status
पुणे: ‘म्हाळुंगे किंग’ पोस्ट जीवावर बेतली; अपहरण करून गुजरातमध्ये जाळून केली हत्या, वाचा सगळा घटनाक्रम
Manoj Bajpayee father auditioned at FTII
NSD मध्ये रिजेक्ट झालेल्या अभिनेत्याच्या वडिलांनी FTII मध्ये दिली होती ऑडिशन, धर्मेंद्र अन् मनोज कुमार होते उपस्थित, वाचा किस्सा
uddhav thackeray slams narendra modi during in an interview with the indian express
मोफत धान्य देण्यापेक्षा रोजगार का देत नाही? ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांचा मोदींना सवाल
Orenthal James Simpson
स्पोर्ट्समन, सेलेब्रिटी… मग पत्नीची हत्या, निर्दोष मुक्तता तरी कफल्लक आयुष्य… ओ. जे. सिम्प्सन यांचे आजही अमेरिकेवर गारूड कसे?

आणखी वाचा : कार्तिक आर्यनला भेटायला चाहत्याने सायकलवर केला ११६० कीमी प्रवास; अभिनेत्याची ‘ही’ कृती चर्चेत

‘टीआरएस पॉडकास्ट’ या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये नुकताच शेखर कपूर यांनी या गोष्टींचा खुलासा केला आहे. अनिल व बोनी हे चिंताग्रस्त होते कारण त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा पैसा या चित्रपटावर लागला होता. शेखर कपूर म्हणाले, “चित्रपट जेव्हा सुरू झाला अन् प्रदर्शनासाठी सज्ज झाला तेव्हासुद्धा अनिल चांगलाच घाबरलेला होता. तो आणि बोनी कपूर प्रचंड घाबरतात. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा पैसा यावर लागला होता, अन् चित्रपट चालला नसता तर त्यांचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले असते.”

परंतु घडलं विपरीतच, चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हीट ठरला. इतका की आजही प्रेक्षक या चित्रपटाची आवर्जून आठवण काढतात. श्रीदेवी व अनिल कपूर यांची केमिस्ट्री लोकांना पसंत पडली. त्या दोघांवर चित्रित झालेलं ‘कांटे नहीं कटते’ हे गाणं चांगलंच गाजलं. खासकरून चित्रपटातील छोट्या मुलांचे काम लोकांना पसंत पडले, अन् सर्वात महत्त्वाचं म्हणजे गब्बर सिंह नंतर बॉलिवूडला त्यांचा आणखी एक आयकॉनिक व्हिलन मिळाला तो म्हणजे मोगॅम्बो. अमरिष पुरी यांनी ही भूमिका साकारली होती. हा चित्रपट सुपरहीट ठरला आणि अनिल कपूर व बोनी कपूर यांच्या चिंता कायमची मिटली.