अभिनेते शेखर सुमन हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आपल्या पत्नीला एक आलीशान कार भेट दिली आहे. त्याचे काही फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये शेखर सुमन नव्या ‘BMW’सह पोज देताना दिसत आहेत. शेखर सुमन सलमान खानच्या ‘बिग बॉस १६’ या रिअॅलिटी शोमध्ये रविवारच्या एका खास सेगमेंटचे सूत्रसंचालन करायचे, चाहत्यांनाही हा एपिसोड खूप आवडायचा.

शेखर सुमनने पत्नी अलका हिला BMWi7 सीरीजची एक महागडी कार भेट दिली आहे. कारची किंमत ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल . या कारची किंमत २.४ कोटी रुपये आहे. या आलिशान कारने अभिनेत्याने पत्नी अलकाला आश्चर्यचकित केले. लग्नाचा वाढदिवस खास बनवण्यासाठी शेखर सुमन यांनी तब्बल अडीच कोटी रुपये खर्च केले.

आणखी वाचा : “आता खुपणार नाही तर…” अवधूत गुप्तेचा लोकप्रिय कार्यक्रम ‘खुपते तिथे गुप्ते’ लवकरच होणार सुरू

शेखर सुमन यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोत त्यांच्याबरोबर मुलगा अध्ययन सुमनही दिसत आहे. दोघेही कारला किस करताना दिसत आहेत. दुसऱ्या एका छायाचित्रात अलका लग्नाच्या वाढदिवसानिमित्त केक कापताना दिसत आहे. बिग बॉस १६ मध्ये दिसलेल्या शिव ठाकरेनेही शेखर सुमनचे या खास प्रसंगी अभिनंदन केले.

View this post on Instagram

A post shared by Adhyayan S Suman (@adhyayansuman)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेखर सुमन गेल्या अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत कार्यरत आहेत. शेखर यांचा मुलगा अध्ययन सुमन रोहित शेट्टीच्या ‘खतरों के खिलाडी सीझन १३’ मध्ये दिसणार असल्याची चर्चा होत होती. मीडिया रीपोर्टनुसार तो आता या शोचा भाग नसेल हे स्पष्ट झालं आहे. अध्ययन सुमन सध्या एका एका मोठ्या ओटीटी प्रोजेक्टवर काम करत आहे.