Shilpa Shetty Restaurant Bastian food prices : शिल्पा शेट्टीच्या बास्टियन रेस्टॉरंटची सध्या खूप चर्चा आहे. बास्टियनमधून शिल्पा दररोज कोट्यवधी रुपयांची कमाई करत आहे. शिल्पाच्या या रेस्टॉरंटमध्ये पदार्थांच्या किमती किती आहेत? त्याबद्दल आता माहिती समोर आली आहे.
शिल्पा शेट्टीच्या बास्टियन रेस्टॉरंटमध्ये, जास्मिन हर्बल चहाची किंमत ९२० रुपये आहे. इथे इंग्लिश ब्रेकफास्ट टीची किंमत ३६० आहे. तर फ्रेंच डोम पेरिग्नॉन ब्रुट रोझची बाटली १५९,५०० पर्यंत आहे. साधारणपणे कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये जेवणाची किंमत ५०० ते १,२०० रुपयांदरम्यान असते.
रिपोर्ट्सनुसार, बास्टियनमध्ये चिली गार्लिक नूडल्स आणि चिकन बुरिटो सारखे पदार्थ अनुक्रमे ६७५ आणि ९०० रुपयांना मिळतात. बरेटा सॅलडची किंमत १,०५० रुपये आणि अॅव्होकाडो टोस्टची किंमत ८०० रुपये आहे. बास्टियन अॅट द टॉप हे मुंबईतील सर्वात प्रसिद्ध रेस्टॉरंट्सपैकी एक आहे. इथे बुकिंग लवकर मिळत नाही, इतकी गर्दी असते.
बास्टियनमध्ये एका रात्रीची कमाई किती?
लेखिका शोभा डे यांनी बास्टियनच्या कमाईबद्दल एका मुलाखतीत सांगितलं. बास्टियनमध्ये एका रात्रीत २-३ कोटी रुपयांची होते. “ते ७०० लोकांसाठी प्रत्येकी दोन सीटिंग देतात आणि एका रात्रीत इथे १,४०० लोक येऊ शकतात. दादरमध्ये बास्टियनच्या बाहेर रस्त्यावर लोक खाली वाट पाहत असतात, इतकी वेटिंग लिस्ट या रेस्टॉरंटबाहेर असते. मुंबईच्या मध्यभागी असलेल्या या रेस्टॉरंटमध्ये लोक लॅम्बोर्गिनी आणि अॅस्टन मार्टिनसारख्या लक्झरी गाड्यांमध्ये येतात. हे लोक कोण आहेत? मला काहीच माहिती नाही,” असं शोभा डे म्हणाल्या.
शिल्पा शेट्टी बास्टियनच्या कमाईबद्दल काय म्हणाली होती?
मागच्या वर्षी शिल्पा शेट्टीने रेस्टॉरंटमधील कमाईबद्दल होणाऱ्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली होती. “सगळे आकडे खोटे आहेत, आम्ही त्या आकड्यांपेक्षा कैकपटीने जास्त कमाई करत आहोत. मागच्या वर्षी आम्ही हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीत सर्वाधिक जीएसटी भरला होता. माझा मॅनेजर सांगतो की माझ्या कामापेक्षा जास्त बास्टियनमध्ये बुकिंगसाठी त्याला फोन येतात,” असं शिल्पा शेट्टी म्हणाली होती.
शिल्पा शेट्टीने २०१९ मध्ये बास्टियन ब्रँडचे संस्थापक व रेस्टॉरंट मालक रणजीत बिंद्रा यांच्याबरोबर या व्यवसायात भागीदारी केली. आता ती संपूर्ण भारतातील अनेक बास्टियन रेस्टॉरंट्सची सह-मालकीण आहे. या ब्रँडमध्ये तिची भागीदारी ५० टक्के आहे. शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्यावर जुहू येथील एका व्यावसायिकाची ६०.४८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. परदेशात प्रवास करण्याची परवानगी मिळविण्यासाठी त्यांना सर्वात आधी ६० कोटी रुपये जमा करावे लागतील, असं न्यायालयाने म्हटलंय.
