अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा उद्योगपती राज कुंद्रा काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच राजने आपल्या बायोपिकची घोषणा केली होती. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर सोहळा पार पडला. या सोहळ्यात राजने पहिल्यांदा आपल्या चेहऱ्यावरचा मुखवटा काढत मीडियाशी संवाद साधला. दरम्यान, राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी विभक्त होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. राज कुंद्राने आपल्या ट्वीटर अकाउंटवर एक ट्वीट केलं आहे. राजच्या या ट्वीटमुळे अनेक तर्क-वितर्क केले जात आहेत.
हेही वाचा- “…ते माझे पहिले प्रेम होते”, अक्षय कुमारने केला खुलासा, म्हणाला “मी २३ वर्षांचा…”
राजने ट्वीट करीत लिहिलं “आम्ही वेगळे झालो आहोत आणि या कठीण परिस्थितीत आम्हाला वेळ द्या, अशी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे.” राजच्या या ट्वीटचा संबंध अनेकांनी शिल्पा शेट्टीबरोबर जोडला आहे. एकंदरीत या ट्वीटमुळे राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी वेगळे झाले असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, अद्याप या ट्वीटबाबत शिल्पाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. राजने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर या ट्वीटचे स्क्रिनशॉर्ट शेअऱ केला आहे.
या पोस्टवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करीत आहेत. अनेकांनी कमेंट करीत राज कुंद्राला ट्रोल केले आहे. एका युजरने कमेंट करीत विभक्त म्हणजे घटस्फोट का, असा प्रश्न विचारला आहे. तर, काहींनी हा ‘पब्लिसिटी स्टंट’ असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा- रेखा यांना अमिताभविषयी ‘तो’ प्रश्न कसा विचारला? सिमी गरेवाल यांनी जयललितांचा उल्लेख करत दिलेलं उत्तर
राज कुंद्राच्या बायोपिक ‘यूटी ६९’ या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले, तर ३ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात राज कुंद्राने मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारली आहे. आर्थर रोड तुरुंगात घालवलेल्या दिवसांच्या कथेवर हा चित्रपट आधारित आहे. जुलै २०२१ मध्ये पोर्नोग्राफीप्रकरणी राज कुंद्राला अटक करण्यात आली होती. दोन महिने त्याला तुरुंगात राहावे लागले होते.