अभिनेते अमिताभ बच्चन हे बॉलिवूडचे महानायक म्हणून ओळखले जातात. संपूर्ण बच्चन कुटुंबीय त्यांच्या कामाबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही चर्चेत असतात. त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीचे सर्वांनाच अप्रूप वाटते. त्यांची मुलगी श्वेता बच्चन-नंदा ही बॉलिवूडचा भाग नसली तरी तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. ती काय करते किंवा तिच्या आयुष्यात सध्या काय सुरू आहे हे देखील ती चहात्यांशी शेअर करत असते. आता नुकताच तिने तिला मिळालेले पहिल्या पगाराबद्दल एक खुलासा केला आहे.

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिने ‘व्हॉट द हेल नव्या’ हा नवा पॉडकास्ट चॅनेल सुरू केला आहे. या चॅनलच्या मार्फत ती महिलांच्या आयुष्यात महत्त्वाच्या असणाऱ्या गोष्टींबद्दल चर्चा करते. नव्याची आई श्वेता बच्चन ही जया बच्चन यांच्यासह ‘व्हॉट द हेल नव्या’ या पॉडकास्ट चॅनलच्या एका एपिसोडमध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिने तिच्या करिअरबद्दल अनेक खुलासे केले. तसेच तिला मिळालेला पहिला पगारही सांगितला.

आणखी वाचा : “मी समाजसेविका आहे आणि…”; राखी सावंतने साजिद खानवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध उठवला आवाज

नव्याने तिच्या पॉडकास्टमध्ये पैसे कमावणे आणि ते हाताळणे या मुद्द्यावर आई आणि आजीशी चर्चा केली. यावेळी श्वेता बच्चन हिने तिच्या पहिल्या कामाचा अनुभव सांगितला. ती म्हणाली, “मी जेव्हा लग्न करून दिल्लीला नवीन राहिला आले होते तेव्हा मी पहिल्यांदा नोकरी केली. एका बालवाडीत मी शिक्षिका म्हणून काम करायचे. ते काम करण्यासाठी मला प्रत्येक महिन्याला ३ हजार रुपये मिळायचे. त्यावेळी मिळवलेले ३ हजार ही माझी पहिली कमाई होती. ते पैसे मी बँकेत ठेवले.”

पुढे ती म्हणाली, “माझ्या आईने मला पैसे कसे हाताळायचे हे कधीही शिकवले नाही. तिने जर या गोष्टीचे मला धडे दिले असते तर मला अभिषेककडे पैसे मागण्याची कधीही गरज भासली नसती. शाळा कॉलेजच्या दिवसात कुठे बाहेर फिरायला जायचे असेल तेव्हा मी अभिषेक कडे पैसे मागायचे. मला पैसे कसे हाताळायचे हे अजिबात येत नाही. आज आमच्या घराच्या महिन्याच्या खर्चाचा हिशोबही नव्याच ठेवते.”

हेही वाचा : भाऊबीजेच्या दिवशी श्वता नंदाने उलगडलं अभिषेक बच्चनबरोबरच्या हसत्या-खेळत्या नात्याचं गुपित, फोटो व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जवळपास २४ वर्षांपूर्वी श्वेता बच्चन हिचे लग्न निखिल नंदाशी झाले. निखिल नंदा हा व्यवसायिक आहे. कामानिमित्त तो दिल्लीला असतो. श्वेताही लग्नानंतर काही वर्ष दिल्लीला स्थायिक होती. पण जेव्हा मुले झाली तेव्हा श्वेता दोन्ही मुलांसोबत ‘जलसा’ बंगल्यामध्ये राहू लागली. त्यावेळी श्वेताचे तिच्या सासरी पटत नसल्यामुळे ती बिग बींसोबत राहते अशा अफवा तेव्हा सुरु झाल्या होत्या. मात्र तिच्या वैवाहिक जीवनातही कोणतेही अडथळे नसल्याचे तिने स्पष्ट केले होते. केवळ स्वत:च्या करिअरवर लक्ष देण्यासाठी ती आई-वडिलांसोबत राहत असल्याचे तिने सांगितले होते.