गेले तीन चार दिवस प्रत्येकजण दिवाळी साजरी करण्यात मग्न होता. कोणी फटाके उडवत, कोणी नातेवाईकांच्या घरी जात, तर कोणी आपल्या घरच्यांबरोबर फराळाचा आनंद घेताना दिसलं. कलाकारही यात मागे नाहीत. गेल्या तीन-चार दिवसात जवळपास सगळ्या कलाकारांनी ते यंदा दिवाळी कशी साजरी करत सोशल मीडियावरून दाखवले. यात अभिषेक बच्चन आणि श्वेता नंदाही मागे नाहीत. काल त्यांनी एकत्र मिळून भाऊबीज साजरी केली. पण यावेळी श्वेताने पोस्ट केलेल्या एका फोटोची सर्वत्र चर्चा आहे.

आणखी वाचा : “या क्षेत्रात मला कधीही…”; कृतिका कामराचे बॉलिवूडमधील घराणेशाहीबद्दल मोठे विधान

श्वेता आणि अभिषेक ही बॉलीवूडची प्रसिद्ध भावा-बहिणीची जोडी आहे. दोघंही वेळोवेळी एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहताना दिसतात. त्यामच्या मनात एकमेकांबद्दल असलेले प्रेम हे आता जगजाहीर आहे. बऱ्याच कार्यक्रमांनाही त्यांनी एकत्र हजेरी लावली आहे. अनेकदा ते एकमेकांबरोबर मजा मस्ती करताना, त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एकमेकांचे फोटो पोस्ट करताना दिसतात. आता भाऊबीजेच्या निमित्ताने श्वेता नंदाने त्यांचा एक फोटो शेअर केला आहे, ज्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

View this post on Instagram

A post shared by S (@shwetabachchan)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काल श्वेता आणि अभिषेकने भाऊबीज साजरी करताना काढलेला एक हटके फोटो श्वेताने सोशल मीडियावर पोस्ट केला. या फोटोत दोघेही पारंपरिक पकड्यांमध्ये दिसत आहेत. पण या सगळ्यात लक्ष वेधून घेतलं ते या फोटोतील अभिषेकच्या चेहऱ्यावरील हावभावांनी. या फोटोत अभिषेक श्वेताला चिडवतोय असं दिसत आहे, तर श्वेता त्रासलेली दिसत आहे. अर्थात, त्यांनी हा फोटो गमतीत काढला आहे. यासोबत श्वेताने आणखी एक फोटो शेअर केला, ज्यात ते दोघे एकमेकांकडे बघून हसताना दिसत आहेत.

हेही वाचा : ‘घरात होतो मुला- मुलींमध्ये भेदभाव’ लेकीच्या वक्तव्यावर श्वेता बच्चनचं स्पष्टीकरण, म्हणाली…

हे फोटो शेअर करत शवेताने लिहिलं, “काय मुलगा आहे, फक्त सनशाईन आणि रेन्बो, भाऊबीजेच्या शुभेच्छा.” श्वेता नंदाने पोस्ट केलेले हे फोटो सगळ्यांना चांगलेच आवडलेत. त्यांच्या चाहत्यानप्रमांणेच अनेक सेलिब्रिटींनीही त्यावर कमेंट्स केल्या आहेत.