‘कान फिल्म फेस्टिव्हल’मध्ये मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंत आता ४८ वर्षांनी ‘मंथन’ सिनेमा पुन्हा एकदा भारतात चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. याबाबत फिल्म हेरिटेज फाऊंडेशनने सोमवारी माहिती दिली. श्याम बेनेगल यांचा ‘मंथन’ पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहता येणार असून त्यासाठी तिकीट बुकिंग सुरू झाले आहे.

१९७६ साली आलेल्या या चित्रपटाच्या निर्मितीसाठी ४८ वर्षांपूर्वी गुजरातमधील पाच लाख शेतकऱ्यांनी आर्थिक मदत केली होती. प्रत्येकी दोन रुपये शेतकऱ्यांनी दान केले होते. १७ मे रोजी ‘कान फिल्म फेस्टिव्हल’मध्ये कान क्लासिक सेगमेंटमध्ये या चित्रपटाचं स्क्रीनिंग करण्यात आलं.

प्रदर्शनानंतर ४८ वर्षांनी ‘मंथन’चं Cannes मध्ये खास स्क्रीनिंग, ५ लाख शेतकऱ्यांच्या मदतीने तयार झालेला चित्रपट!

ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी त्यांच्या अभिनेत्री पत्नी रत्ना पाठक शाह, दिवंगत सहकलाकार स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बर, डॉ. कुरियन यांची कन्या निर्मला कुरियन, अमूल एमडी जयेन मेहता आणि एफएचएफ संस्थापक शिवेंद्रसिंह डुंगरपूर यांच्यासह कान्सच्या रेड कार्पेटवर वॉक केला होता. या स्क्रीनिंगनंतर चित्रपट प्रदर्शित करण्याची योजना असल्याचं शिवेंद्रसिंह यांनी आधीच सांगितलं होतं, त्यानुसार हा सिनेमा आता प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा दोन दिवसांसाठी देशातील काही मोजक्या शहरांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.

जान्हवी कपूरच्या बॉयफ्रेंडच्या आईला पाहिलंत का? आमदार प्रणिती शिंदेंच्या बहीण आहेत मराठमोळ्या स्मृती पहारिया

३८ शहरांमध्ये प्रदर्शित होणार सिनेमा

रिस्टोअर्ड ‘मंथन’ १ व दोन जून रोजी भारतातील काही मोजक्याच शहरांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. त्या शहरांमध्ये मुंबई, नवी दिल्ली, आणंद, राजकोट, चेन्नई, कोची, हैदराबाद, जयपूर, बडौदा, सूरत आणि चंदीगडसह ३८ शहरांमध्ये पुन्हा सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित केला जाईल. “बुकिंग ओपन आहे! पाच लाख शेतकऱ्यांची निर्मिती असलेला श्याम बेनेगल यांचा ‘मंथन’ हा ऐतिहासिक चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी गमावू नका!’ असं एफएचएफने एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे.

“मी आई झाले नाही कारण…”, मूल न होऊ देण्याबद्दल अरुणा इराणींनी सोडलं मौन; म्हणाल्या, “विवाहित पुरुषाशी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
manthan
मंथन पुन्हा पडद्यावर पाहता येणार

‘मंथन’ हा लोकांनी दिलेल्या देणगीतून निर्मिती करण्यात आलेला पहिला भारतीय चित्रपट आहे. जवळपास पाच लाख शेतकऱ्यांनी या चित्रपटासाठी प्रत्येकी दोन रुपये दान केले होते. विजय तेंडुलकर आणि डॉ. कुरियन यांनी चित्रपटाची कथा लिहिली होती. स्मिता पाटीलशिवाय नसीरुद्दीन शाह, गिरीश कर्नाड, कुलभूषण खरबंदा, मोहन आगाशे, अनंत नाग आणि अमरीश पुरी यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाला १९७७ साली सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तसेच सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी विजय तेंडुलकर यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्या वर्षी भारताने ऑस्करसाठी हा सिनेमा पाठवला होता.