बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी ७ फेब्रुवारी २०२३ या दिवशी लग्नबंधनात अडकले. सिद्धार्थ आणि कियारा यांच्या लग्नाची गेले बरेच महीने चर्चा सुरू होती. त्यांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. राजस्थानच्या जैसलमेर या ठिकाणी असलेल्या सूर्यगढ पॅलेसमध्ये त्या दोघांनी सप्तपदी घेत लग्नगाठ बांधली.

“आता आमची कायमस्वरुपी बुकींग झाली आहे. आमच्या पुढील वाटचालीसाठी तुमचे आशीर्वाद आणि प्रेम असू द्या”, असे कॅप्शन त्यांनी हे फोटो शेअर करताना दिले आहेत. या लग्नसोहळ्यात बऱ्याच सेलिब्रिटीजनी हजेरी लावली. २ दिवस आधीपासूनच करण जोहर, शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा कपूर यांचे एयरपोर्टवरचे फोटोज व्हायरल झाले. अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीतच हा सोहळा संपन्न झाला.

आणखी वाचा : सिद्धार्थ – कियाराचे लग्नातील फोटो व्हायरल; ‘या’ अभिनेत्याच्या पत्नीने मागितली नव्या जोडप्याची माफी

कियारा सिद्धार्थ यांनी शेअर केलेल्या पहिल्या फोटोत ते दोघेही एकमेकांसमोर हात जोडून हसताना दिसत आहे. दरम्यान ‘बॉलिवूड लाईफ’ या वेबसाईटने सिद्धार्थ आणि कियारा यांच्या लग्नातील बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला आहे. त्याच्या रीपोर्टनुसार लग्नात सिद्धार्थ चक्क कियाराच्या पाया पडला. लग्नातील एका विधीदरम्यान नवरी नवऱ्याच्या पाया पडून आशीर्वाद घेते. या विधीदरम्यान सिद्धार्थनेही कियाराच्या पाया पडत दोघेही सारखेच आहेत असा संदेश दिला.

View this post on Instagram

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिद्धार्थच्या या कृतीमुळे कियाराच्या मनातील सिद्धार्थबद्दलचा आदर आणखी वाढला असणार हे निश्चित. सध्या सोशल मीडियावर सगळेच या नवविवाहित जोडप्याला भरभरून शुभेच्छा देत आहेत. बॉलिवूडमधील लोकांनीसुद्धा यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आता लवकरच सिद्धार्थ आणि कियारा मुंबई आणि दिल्लीत एक खास रीसेप्शन देणार असल्याची चर्चा होत आहे.