Sikandar Box Office Collection Day 5 : सलमान खानच्या ‘सिकंदर’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर निराशजनक कामगिरी केली आहे. या सिनेमाचं मूळ बजेटही अद्याप वसूल झालेलं नाही. भाईजानचं दीड वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन होणार असल्याने ‘सिकंदर’कडून प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा होत्या. पण, चित्रपटाचं कथानक, दिग्दर्शन, एडिटिंग अशा अनेक गोष्टी सलमानच्या चाहत्यांसह प्रेक्षकांना खटकल्या आहेत. परिणामी, सिनेमाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे.

‘सिकंदर’ पहिल्याच दिवशी ग्रँड ओपनिंग करेल असा विश्वास स्वत: सलमानला देखील होता. मात्र, या सिनेमाने पहिल्या दिवशी केवळ २६ कोटींची कमाई केली. याउलट फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित झालेल्या विकी कौशलच्या ‘छावा’ सिनेमाने कमी शो मिळूनही बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी तब्बल ३३.१ कोटींचा गल्ला जमावला होता. ‘सिकंदर’ला त्या तुलनेत संपूर्ण देशभरात शोज देखील जास्त मिळाले होते.

सलमान खानच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी २६ कोटी, दुसरा दिवस ( सोमवार ) २९ कोटी, तिसऱ्या दिवशी ( मंगळवार ) १९.५ कोटी तर, चौथ्या दिवशी (बुधवार ) ९.७५ कोटींची कमाई केली आहे.

मात्र, सलमानच्या सिनेमाने पाचव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप कामगिरी केल्याचं पाहायला मिळत आहे. या सिनेमाने पाचव्या दिवशी फक्त ५.७५ कोटी कमावले आहेत. सिनेमाच्या कमाईत पाचव्या दिवशी तब्बल ४१ टक्क्यांनी घट झालेली आहे. तसेच या सिनेमाचं पाच दिवसांचं एकूण कलेक्शन ९० कोटी एवढं झालं आहे.

आतापर्यंत म्हणजे प्रदर्शित झाल्यापासून गेल्या ५ दिवसांमध्ये ‘सिकंदर’ने फक्त ९० कोटींचा गल्ला जमावला आहे. सिनेमाला अद्याप आपलं मूळ बजेट अर्धही वसूल करता आलेलं नाही. ‘सिकंदर’चं मूळ बजेट २०० कोटी आहे आणि सध्याची परिस्थिती पाहता सलमानच्या सिनेमाला १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेताना देखील मोठी कसरत करावी लागतेय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘सिकंदर’ मध्ये सलमान खानसह रश्मिका मंदाना, प्रतिक बब्बर, सत्यराज, शर्मन जोशी, काजल अग्रवाल, किशोर, संजय कपूर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकले आहेत. तर, सिनेमाचं दिग्दर्शन ए. आर. मुरुगादोस यांनी केलं आहे.