सामान्य लोकांना बॉलिवूडमधील कलाकार त्यांचे आयुष्य याबद्दल उत्सुकुता लागून राहिलेली असते. सेलिब्रेटीदेखील सोशलक मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. बॉलिवूडचे कलाकार हसे अभिनय, स्टाईलसाठी प्रसिद्ध आहेत तसेच मदतीसाठीदेखील कायम पुढे असतात. अभिनेता सोनू सूद या सगळ्यात पुढे असतो. करोनाकाळात त्याने गोरगरीब मजूर लोकांना आपापल्या गावी पोहचवण्याचे काम केले होते. आपल्या गाण्याने प्रेक्षकांची मने जिंकणारी गायिका अभिनेत्री नेहा कक्कर आता चर्चेत आली आहे.

सोशल मीडियावर तिच्या एका कृतीचे कौतुक केले जात आहे. नेहाने एका अपंग व्यक्तीला पैश्याच्या माध्यमातून मदत केली आहे. त्या व्यक्तीला पैसे देतानाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये नेहाने त्या व्यक्तीला पैसे दिले आणि आपल्या गाडीत बसून निघून गेली. काही दिवसांपूर्वी तिने असेच गरजू लोकांना आर्थिक मदत केली होती.

Photos : लग्नानंतरदेखील बोल्ड सीन्स देण्यासाठी कचरल्या नाहीत ‘या’ अभिनेत्री! पाहा फोटो

एरव्ही सोशल मेंदीवर ट्रोल होणाऱ्या नेहाचे नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे. ‘तू बेस्ट आहेस’ असं एकाने लिहले आहे ‘तिच्या असा कृतीमुळे ती आज यशस्वी आणि आनंदी आहे’ असं एकाने म्हंटले आहे. तिने पैसे देताना लांबून दिले आहेत त्यावरून काही जणांनी लिहले आहे ‘इतक्या लांबून पैसे द्यायची काय गरज होती’? तर एकाने लिहले आहे ‘अजून दोन पाऊले चालली असतीस तर चप्पल तुटली असती का’? असा सवाल केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेहा कक्करने रायझिंग स्टार फेम गायक रोहनप्रीत सिंगसोबत २४ ऑक्टोबर २०२० रोजी नेहाने लग्नगाठ बांधली. काही दिवसांपूर्वी तिने फाल्गुनी पाठक यांचे एक गाणे आपल्या अंदाजात सादर केले होते. यावरून दोघींच्यात वाद निर्माण झाला होता.