Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या पहलगामच्या बैसरन येथे मंगळवारी, २२ एप्रिलला दुपारी दहशतवादी हल्ला झाला. ‘छोटे स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाण्याऱ्या बैसरनमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केलं. यात २७ पर्यटकांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचा देखील समावेश आहे. गेल्या सहा वर्षांतील काश्मीरमधील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतासह जगभरात संताप व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावर संतापची लाट पाहायला मिळत आहे. प्रत्येक क्षेत्रातील दिग्गज मंडळी शोक व्यक्त करत आहेत. अशातच लोकप्रिय गायिका श्रेया घोषालने मोठा निर्णय घेतला आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट करत निषेध व्यक्त केला. प्रसिद्ध गायकांनी तर कॉन्सर्ट रद्द केला आहे. बादशाह, अरिजित सिंह यांच्या पावलावर पाऊल ठेवून श्रेया घोषालने देखील हा मोठा निर्णय घेतला आहे. आज, सूरतमध्ये होणारा कॉन्सर्ट श्रेया घोषालने रद्द झाल्याचं जाहीर केलं आहे. यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली आहे.

पोस्टमध्ये लिहिलं की, महत्त्वाची अपडेट, आयोजकांबरोबर विचार-विनिमय करून २६ एप्रिलला होणारा सूरत येथील कॉन्सर्ट आदर आणि शोक म्हणून रद्द गेला जात आहे. त्यामुळे सर्व लोकांच्या तिकिटाचे पैसे परत केले जातील. कोणत्याही प्रश्नांसाठी किंवा मदतीसाठी ईमेलद्वारे संपर्क साधण्याचा पर्याय दिला आहे.

श्रेया घोषालने तिच्या चाहत्यांना हा निर्णय समजून घेण्याचं आवाहन केलं आणि या दुःखाच्या काळात एकजूट राहण्याचा संदेश दिला. यापूर्वी, अरिजीत सिंह यांनी २७ एप्रिल रोजी चेन्नई येथे होणारा त्याचा कॉन्सर्ट रद्द केला होता. त्याने लोकांच्या तिकिटाचे पैसे परत देण्याच्या प्रक्रियेची माहितीही शेअर केली होती.

View this post on Instagram

A post shared by Tarish entertainment (@tarish_entertainment)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरातील कलाकार त्यांचे प्रोजेक्ट्स आणि कार्यक्रम पुढे ढकलत आहेत किंवा रद्द करत आहेत. या हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे आणि सर्वत्र शोककळा पसरली आहे. संपूर्ण देश दहशतवाद्यांविरुद्ध एकच आवाजात उठवत आहेत. अभिनेता सलमान खान, शाहरुख खान, प्रियांका चोप्रा, हृतिक रोशन, शाहिद कपूर, आलिया भट्ट, अनुष्का शर्मा, अक्षय कुमार, करीना कपूर, विकी कौशल, सिद्धार्थ मल्होत्रा, संजय दत्त आणि रवीना टंडन यांनी या हल्ल्याबद्दल शोक व्यक्त केला होता.