बॉलिवूडचा दबंग सलमान खानच्या ‘लकी’ चित्रपटातून पदार्पण करणारी स्नेहा उल्लाल सध्या मोठ्या पडद्यापासून लांब आहे. स्नेहाचा ‘लकी’ चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा तिच्यात आणि ऐश्वर्या रायमध्ये बरंच साम्य असल्याच्या चर्चा रंगल्या होता. तिचा पहिलाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला असला तरी तिच्या सौंदर्याची प्रशंसा झाली.

स्नेहाने बॉलिवूडबरोबरच बऱ्याच दाक्षिणात्य चित्रपटातही काम केलं आहे. नुकतंच स्नेहाने ‘बॉलिवूड हंगामा’ला एक विशेष मुलाखत दिली ज्यात तिने तिच्या फिल्मी प्रवासाबद्दल बरेच खुलासे केले. शिवाय या मुलाखतीमध्ये तिला ऑफर केलेल्या एका हॉलिवूड प्रोजेक्टबद्दलही तिने खुलासा केला आहे. स्नेहाने तो चित्रपट नाकारला होता. त्यामागील नेमकं कारण काय होतं याबद्दल तिने खुलासा केला आहे.

आणखी वाचा : “मला भेटली तर थोबडवून काढेन…” उर्फी जावेदच्या वक्तव्यानंतर चित्रा वाघ पुन्हा आक्रमक

स्नेहा म्हणाली, “होय मला एका हॉलिवूड चित्रपटासाठी विचारण्यात आलं होतं, पण त्यात खूप नग्नता होती. शिवाय भारतीय प्रेक्षकांच्या उद्देशाने ते त्यात बदलही करणार होते. मी यासाठी तेवढी तयार नव्हते. कदाचित एखाद्या दुसऱ्या भारतीय अभिनेत्रीने ते सहज केलं असतं. त्या वेळेस माझ्यासाठी अशी नग्नता चित्रपटात असणं हे खूप धक्कादायक होतं आणि मी ते करणारच नव्हते ही मनाशी खूणगाठ बांधली होती.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्नेहाने ‘क्योकी सांसभी कभी बहू थी’ या लोकप्रिय मालिकेतही काम केलं आहे. बॉलिवूडमध्ये बस्तान बसवण्यात अपयशी ठरल्याने स्नेहाने तिचा मोर्चा नंतर दक्षिणेकडे वळवला. तेलुगू चित्रपटात तिला काम मिळालं आणि तिचे चित्रपट चालूही लागले. सध्या ती वेबविश्वातही काम करत आहे.