बॉलीवूडमधील गायिका सोना मोहापात्रा तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहे. सोना आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. ‘मीटू’ चळवळीच्या काळातही तिने अनेक खुलासे केले होते आणि ‘मीटू’ चळवळीत आपल्यावरील झालेल्या अत्याचाराबद्दल बोलणाऱ्या अभिनेत्रीचं तिने समर्थन केले होते. एका मुलाखतीत सोना महापात्राने संगीतकार अनु मलिकबद्दल एक खुलासा केला होता.

रिअ‍ॅलिटी शोमधून काढून टाकण्याचा आरोप

सोना महापात्राने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिच्या स्पष्ट बोलण्याच्या स्वभावामुळे तिला एका रिअ‍ॅलिटी शोमधून काढून टाकण्यात आले होते. याशिवाय तिने अनु मलिकवरही गंभीर आरोप करत त्याच्या एका घटनेचा उल्लेख केला होता . सोनाने सांगितले होते की अनु मलिकने तिच्यावर असभ्य भाषेत टिप्पणी केली होती.

हेही वाचा…KBC 16: अभिषेक बच्चनने सांगितली बिग बींची ‘ती’ विचित्र सवय; म्हणाला, “ते इतरांचे…”

अनु मलिक संबंधीची ही घटना सोनाने ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीतही सांगितली होती. ती म्हणाली होती, “ऑक्टोबर २००६ मध्ये मी अनु मलिक यांना पहिल्यांदा एका पुरस्कार सोहळ्यासाठी भेटले. त्यांनी मला आणि रामला (माझ्या पतीला) एका हॉटेलमध्ये लंचसाठी बोलावलं. रामबरोबर अनु यांनी आधी काम केलं होतं, पण त्यांना आमच्या लग्नाबद्दल माहिती नव्हती. मी रेस्ट रूममध्ये गेल्यानंतर त्यांनी रामकडे पाहून अत्यंत असभ्य टिप्पणी केली – राम यार, तुझा काय माल आहे… असं ते म्हणाले होते. ”

सोना महापात्राने यापूर्वी अभिनेता सलमान खानवरही टीका केली आहे. ‘सुलतान’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान, सलमानने स्वत:ची तुलना एका बलात्कार पीडितेच्या अनुभवाशी केली होती. यावर प्रतिक्रिया देत सोनाने सलमानविरोधात सोशल मीडियावर मोठी पोस्ट लिहिली होती. यामुळे तिला अनेकदा ट्रोल करण्यात आले.

हेही वाचा…शाहरुख खान दोन्ही मुलांसह नव्या चित्रपटासाठी येणार एकत्र, ट्रेलर आला समोर; म्हणाला, “आर्यन आणि अबरामबरोबर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोना आणि राम संपत यांची जोडी

सोना महापात्राने म्युझिक डायरेक्टर राम संपतशी लग्न केले आहे. ‘सत्यमेव जयते’ या आमिर खानच्या शोमध्ये प्रत्येक एपिसोडच्या शेवटी सोना गाणी गात असत, आणि ही गाणी राम संपत संगीतबद्ध करत असे. ‘रुपइया’, ‘बेखौफ’, आणि ‘घर याद आता है मुझे’ सोनाची ही गाणी खूप गाजली. ‘फुकरे’ सिनेमातील सोनाच’अंबरसरिया’ हे तिचे गाणेही प्रचंड लोकप्रिय झाले.