अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या तिच्या ‘दहाड’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. ‘दहाड’मध्ये सोनाक्षीने महिला पोलीस अधिकारी ‘अंजली भाटी’ ही भूमिका साकारली आहे. या सीरिजच्या माध्यमातून सोनाक्षीने ओटीटीवर पदार्पण केलं आहे. २०१२ मध्ये, ती ‘रावडी राठोड’ या चित्रपटात दिसली होती, ज्यामध्ये तिने अक्षय कुमारबरोबर काम केलं होतं. आता सोनाक्षीने या चित्रपटाबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे.

हेही वाचा- देवदत्त नागेला ‘आदिपुरुष’च्या सेटवर सैफ अली खान व प्रभासने दिली ‘अशी’ वागणूक; म्हणाला, “ते कधीच…”

‘रावडी राठोड’ चित्रपटात अक्षय कुमारचा सोनाक्षीच्या कंबरेवर हात ठेवून ‘ये मेरा माल है’ असा एक डायलॉग होता. या डायलॉगवरून सोनाक्षीने मोठं वक्तव्य केलं आहे. ‘फिल्म कंपेनियन’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान सोनाक्षी सिन्हा म्हणाली, ‘मी असा चित्रपट अजिबात करणार नाही. त्या वेळी मी खूप लहान होते. त्या वेळी मी असा विचारही करू शकत नव्हते. मी प्रभू देवा आणि अक्षय कुमार यांच्याबरोबर चित्रपट करत आहे हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. अशा परिस्थितीत कोण नकार देईल? संजय लीला भन्साळी या चित्रपटाची निर्मिती करत होते. त्या वेळी माझी विचारसरणी पूर्णपणे वेगळी होती. आज मला असा चित्रपट ऑफर झाला तर मी नाही म्हणेन. काळानुसार गोष्टी बदलतात. मीही बदलले आहे.

हेही वाचा- ‘द केरला स्टोरी’च्या टीमला अपघात, माहिती देत अभिनेत्री व दिग्दर्शक म्हणाले…

सोनाक्षी पुढे म्हणाली, ‘लोक नेहमी मला दोष देत असत आणि अशा परिस्थितीत स्त्रीला नेहमीच खलनायक बनवलं जातं. मात्र, डायलॉग लिहिणाऱ्या लेखकाबद्दल कुणीच काही बोलत नाही. चित्रपटाचं दिग्दर्शन करणाऱ्या व्यक्तीबद्दलही कोणीही बोललं नाही.

हेही वाचा- विकी-साराने शेअर केले नव्या चित्रपटाचे पोस्टर; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित, नेटकरी म्हणतात, “याची गाणी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोनाक्षीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, सोनाक्षीची ‘दहाड’ ही वेब सीरिज नुकतीच ‘डिस्ने प्लस हॉटस्टार’वर प्रसारित झाली आहे. या वेब सीरिजची निर्मिती रीमा कागती आणि झोया अख्तर यांनी केली आहे. ‘दहाड’ या मालिकेत सोनाक्षी सिन्हाने पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. सोनाक्षीबरोबर विजय वर्मा, गुलशन देवैया, सोहम शाह आदी कलाकारही या वेब सीरिजमध्ये आहेत.