सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल यांनी तब्बल ७ वर्षे एकमेकांना डेट केल्यावर २३ जून २०२४ रोजी लग्नगाठ बांधली. या दोघांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला. दोघांचे कुटुंबीय, जवळचे मित्र-मैत्रिणी आणि काही मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये हा लग्नसोहळा पार पडला. या जोडप्याच्या लग्नातील सुंदर फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच अभिनेत्रीने स्वत: इन्स्टाग्रामवर तिचा वेडिंग अल्बम शेअर केला आहे. या सगळ्या फोटोंना सोनाक्षीने वेगवेगळं कॅप्शन दिलं आहे.

सोनाक्षी सिन्हाने शेअर केलेल्या एका फोटोने सध्या सर्वांचं लक्ष वेधून तो म्हणजे पहिल्याच फोटोमध्ये अभिनेत्रीच्या पतीने शाहरुख खानची सिग्नेचर पोज दिली आहे. यामागे एक खास कारण आहे ते म्हणजे, या जोडप्याला वैवाहिक आयुष्याच्या शुभेच्छा देण्यासाठी बॉलीवूडच्या किंग खानने खास मेसेज पाठवला होता. शाहरुखने पाठवलेली व्हॉइस नोट ऐकून सोनाक्षी व तिचा पती दोघंही भारावून गेले होते.

हेही वाचा : सेटवर अमिताभ बच्चन यांनी ‘या’ गोष्टीसाठी परवानगी मागितली अन्…; ‘कल्की 2898 एडी’चे दिग्दर्शक झाले नि:शब्द, नेमकं काय घडलं?

सोनाक्षीने लग्नाचा वेडिंग अल्बम शेअर करताना एकूण दहा फोटो शेअर केले आहेत. यामधल्या एका फोटोमध्ये सोनाक्षीच्या हातात मोबाइल असल्याचं पाहायला मिळत आहे आणि या मोबाइलवर पाठवलेला खास संदेश ऐकून हे जोडपं प्रचंड आनंदी झाल्याचं दिसतंय. हा मेसेज बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानने पाठवला होता. सोनाक्षी याबद्दल सांगते, “आमच्या लग्नाच्या दिवशी झहीरसाठी मुख्य आकर्षण ठरलं तो म्हणजे शाहरुख खानने पाठवलेला मेसेज. झहीरला त्याच्या आवडत्या अभिनेत्याने पाठवलेली व्हॉइस नोट ऐकायली मिळाली. जेव्हा त्याचा मेसेज आला तेव्हा झहीरसाठी तो क्षण खूपच खास होता. आम्हा दोघांच्या आयुष्यातील या खास दिवसासाठी व्हॉइस नोट पाठवून शाहरुखने आम्हाला खूप प्रेम अन् शुभेच्छा दिल्या.”

हेही वाचा : अमेरिकेहून भारतात परतलेली अभिनेत्री मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनी मालिकेत झळकणार? सेटवरील ‘त्या’ फोटोमुळे चर्चांना उधाण

View this post on Instagram

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोनाक्षी सिन्हा लग्नाच्या काही फोटोंमध्ये भावुक झाल्याचं देखील पाहायला मिळत आहे. दरम्यान, अभिनेत्रीने आयुष्यातील या महत्त्वाच्या दिवशी खास आईची साडी नेसून त्यांचेच दागिने घातले होते. तसेच अभिनेत्रीने केसात पांढऱ्या रंगाची फुलं माळल्याचं यावेळी दिसून आलं. सोनाक्षी व झहीर २०१७ पासून एकत्र होते. डेटिंगला सात वर्षे पूर्ण झाल्यावर या जोडप्याने लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला.