Zaheer Iqbal and Sonakshi Sinha’s Video: अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा व तिचा पती झहीर इक्बाल हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात. सोशल मीडियावरदेखील हे कलाकार सक्रिय असतात. सध्या त्यांचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल यांनी एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. लाल रंगाच्या ड्रेसमध्ये सोनाक्षीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या सगळ्यात तिने एक पोज दिली आणि चर्चांना उधाण आले. फोटो काढताना सोनाक्षीने पोटावर हात ठेवला होता, त्यामुळे ती प्रेग्नंट असल्याच्या चर्चा होऊ लागल्या होत्या.

सोनाक्षी सिन्हाच्या नवऱ्याने पापाराझींसमोरच केले असे काही की…

आता सोनाक्षी व झहीर यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. फिल्मीग्यानने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की सोनाक्षी व झहीर फोटो काढण्यासाठी येतात, त्यावेळी पापाराझींसमोर झहीर सोनाक्षीच्या पोटाला हात लावतो आणि म्हणतो सांभाळून, बाळ आहे आणि तो हसतो. त्याचे हे वागणे पाहून सोनाक्षी सुरुवातीला जोरात ओरडते आणि त्यानंतर मोठमोठ्याने हसते. त्याला ती हातावरदेखील मारते.

त्यानंतरदेखील फोटोसाठी पोज देताना झहीर सोनाक्षीच्या पोटावर हात ठेवतो. त्यावेळीदेखील सोनाक्षी त्याचे नाव घेत ओरडते. त्यानंतर तो देखील हसतो आणि मीडियाला मी तिची चेष्टा करत आहे असे सांगतो.

नेटकरी काय म्हणाले?

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले, “दोघे एकमेकांबरोबर खूप खूश आहेत”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “माझी आवडती जोडी आहे”, आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “जो ज्या पद्धतीने चेष्टा करतो, तिला चिडवतो, ते खूप मस्त असते”, एका नेटकऱ्याने लिहिले, “ते एकत्र खूप क्यूट दिसतात”, आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “यांना कोणाची नजर लागू नये, माझी आवडती जोडी आहे”, एका नेटकऱ्याने लिहिले, “ती खूप नशिबावान आहे”, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “झहीर खूप आगाऊ आहे”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत. अशा कमेंट्स करत नेटकऱ्यांनी या जोडीचे खूप कौतुक केले आहे.

सोनाक्षी व झहीर यांच्याबाबत बोलायचे, तर त्यांनी सात वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर गेल्यावर्षी लग्नगाठ बांधली. २३ जून २०२४ ला त्यांनी लग्न केले. सोनाक्षीने झहीरबरोबर विशेष विवाह कायद्यांतर्गत लग्न केले. या विवाहात त्यांच्या जवळचे लोक उपस्थित होते. रिसेप्शनमध्ये मात्र बॉलीवूडमधील कलाकार हजर राहिले होते.

सोनाक्षी व झहीर यांचे आंतरधर्मीय लग्न आहे, त्यामुळे त्यांच्या लग्नानंतर त्यांना तसेच शत्रुघ्न सिन्हा यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले. तसेच, सोनाक्षीचे भाऊ लव आणि कुश या लग्नामुळे आनंदी नसल्याच्या चर्चादेखील झाल्या. शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांच्यावर तसेच सोनाक्षीवर झालेल्या टीकेनंतर अनेक मुलाखतींमध्ये मुलीचा आनंद सर्वात महत्त्वाचा असल्याचे सांगितले. तसेच, सोनाक्षीने देखील झहीर व तिच्या कुटुंबीयांचे संबंध उत्तम असल्याचे वक्तव्य केले आहे.

दरम्यान, झहीर व सोनाक्षी यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. त्यांच्या व्हिडीओंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते.