दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी यांचा ‘गॉडफादर’ चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता सलमान खानही दिसला होता. या चित्रपटातून सलमानने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. हा राजकीय अॅक्शन थ्रीलर चित्रपट ५ ऑक्टोबरला प्रदर्शित झाला. ज्यात सलमानने मसूद भाई ही व्यक्तिरेखा साकारली आहे. तो राजकीय नेता ब्रम्हाची विश्वासू असल्याचं दाखवण्यात आलं आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत असतानाच चिरंजीवी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सलमानचे आभार मानले आहेत.

चिरंजीवी यांनी त्याच्या सोशल मीडिया हॅन्डलवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी सलमान खानचे आभार मानले आहेत. या व्हिडीओमध्ये ते म्हणतात, “धन्यवाद माझ्या प्रिय सल्लू. तू चित्रपटात साकारलेली ‘मसूद भाई’ची भूमिका चित्रपटाच्या यशाची ताकद आहे. तुझे खूप खूप आभार, वंदे मातरम्.” हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये “धन्यवाद सल्लू भाई” असं लिहिलं आहे.

आणखी वाचा- “हिच्यासारखे अनेकजण…” हृतिक रोशनच्या गर्लफ्रेंडचं ट्रोलरला सडेतोड उत्तर, पोस्ट चर्चेत

दरम्यान सलमान खानने याआधी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत चिरंजीवी यांचं चित्रपटाच्या यशानंतर अभिनंदन केलं होतं. सलमानने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं, “माझे प्रिय गुरू, खूप सारं प्रेम, असं ऐकलंय की ‘गॉडफादर’ चांगली कमाई करत आहे. तुमचं अभिनंदन” सलमानची ही पोस्ट बरीच चर्चेत होती. मोहन राजा यांच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या या चित्रपटात नयनतारा आणि सत्यदेव यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

आणखी वाचा-‘गॉडफादर’ला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल सलमानने केली खास पोस्ट; म्हणाला, “माझे प्रिय चिरु…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘गॉडफादर’ हा चित्रपट मूळच्या ‘ल्युसिफर’ या मल्याळम चित्रपटाचा तेलुगू रिमेक आहे. रिपोर्ट्सनुसार या चित्रपटाचं बजेट ९० कोटी रुपये एवढं आहे. या चित्रपटातील सलमान खानच्या अभिनयला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळताना दिसत आहे. सलमान खानच्या कामाबद्दल बोलायचं तर तो सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’मुळे चर्चेत आहे.