बॉलिवूडमध्ये सध्या एकच चर्चा आहे ती म्हणजे तमन्ना भाटिया व विजय वर्मा यांच्या डेटिंगची, नव-वर्षाच्या पार्टीत या दोघांना एकत्र बघितले गेल्याने चर्चाना सुरवात झाली. अशातच काही दिवसांपूर्वी मुंबईच्या वांद्रे भागात एकाच ठिकाणी दिसले होते. त्यामुळे साहजिकच त्यांच्या चात्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. मात्र आता यावरच अभिनेत्रीने भाष्य केलं आहे.

तमन्ना भाटिया दक्षिणेतील एक आघाडीची अभिनेत्री आहे मात्र तिने आता बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवला आहे. हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत तो असं म्हणाली, “आम्ही एकत्र एक चित्रपट केला आहे. अशा अफवा पसरत राहतात. त्या सर्वांचे स्पष्टीकरण करणे आवश्यक नाही. त्याबद्दल मला अधिक काही बोलायचे नाही.” अशा शब्दात तिने प्रतिक्रिया दिली आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील एंट्रीबद्दल पृथ्वीक प्रतापचं मोठं वक्तव्य; म्हणाला, “मला नकार…”

तमन्ना भाटियाच्या फॅन पेजवरुन विजय वर्माबरोबरचा तिचा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. ३१ डिसेंबरच्या पार्टीचा हा व्हिडीओ असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं होतं . या व्हिडीओत दोघे एकमेकांना किस करताना दिसत होते. यावरून त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या.

View this post on Instagram

A post shared by Tamannaah Bhatia (@tamannaahspeaks)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘गली बॉय’ चित्रपटातून विजय वर्माला वेगळी ओळख मिळाली. तमन्ना व विजय सुजॉय घोष यांच्या नेटफ्लिक्स सेगमेंटमध्ये ‘लस्ट स्टोरीज २’ मध्ये एकत्र दिसणार आहे.