‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे महाराष्ट्रभरात लाखो चाहते आहेत. या कार्यक्रमामध्ये काम करणारा प्रत्येक अभिनेता रसिक प्रेक्षकांना खळखळून हसवतो. यातीलच एक अभिनेता म्हणजे पृथ्वीक प्रताप, पृथ्वीकने याआधीदेखील मालिकांमध्ये काम केलं आहे मात्र ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून तो प्रसिद्ध झाला. मात्र या कार्यक्रमात त्याची एंट्री कशी झाली याबद्दल त्याने खुलासा केला आहे.

पृथ्वीक प्रताप हा कायमच चर्चेत असतो. तो सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. इटाईम्सला दिलेल्या मुलाखतीत तो असं म्हणाला, “मी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे निर्माते सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांना आधीच ओळखत होतो. ते आधी ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ कार्यक्रम करायचे. मी आधी त्यासाठी ऑडिशन दिली होती मात्र त्यांनी मला नाकारले होते. मी दुखावलो होतो तसेच माझा अहंकार दुखावला गेला होता.”

“मला वाचव…” मृत्यूपूर्वी ‘हे’ होते सतीश कौशिक यांचे शेवटचे शब्द; लाडक्या लेकीचाही केला उल्लेख

तो पुढे म्हणाला, “नंतर मी त्यांच्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाची ऑडिशन देण्याचे ठरवले आणि माझी निवड झाली. सचिन सरांनी मला ४ ते ५ स्किट्स दिली ज्यात मला माझी क्षमता दाखवायची होती. मी कार्यक्रमच दुसरा सीजन जिंकला मात्र काहीतरी कमतरता राहिली होती.” अशी प्रतिक्रिया त्याने दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पृथ्वीक प्रताप मराठीप्रमाणे हिंदीतदेखील झळकला आहे. बॉबी देओलच्या ‘क्लास ऑफ ८३’ या चित्रपटात त्याने काम केलं आहे. त्याने झी मराठी वाहिनीवरील जागो मोहन प्यारे या मालिकेत काम केलं होतं.