दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनी अभिनयाप्रमाणेच सौंदर्याने चाहत्यांना भुरळ घातली होती. श्रीदेवींचे लाखो चाहते होते. ‘मिस्टर इंडिया’, ‘नगिना’, ‘चालबाझ’, ‘लाडला’ अशा सुपरहिट चित्रपटांतून त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला. ‘गुमराह’ हा श्रीदेवींच्या अनेक गाजलेल्या चित्रपटांपैकी एक. या चित्रपटातील श्रीदेवी व संजय दत्त यांची जोडी प्रेक्षकांच्या भलतीस पसंतीस पडली होती.

१९९३ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात श्रीदेवी व संजय दत्त मुख्य भूमिकेत होते. परंतु, सुरुवातीला श्रीदेवी संजय दत्तबरोबर काम करण्यास तयार नव्हत्या. संजय दत्तबरोबर काम करण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला होता. परंतु, नंतर करिअरसाठी त्या संजय दत्तबरोबर काम करण्यास तयार झाल्या. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान संजय दत्त व श्रीदेवी एकमेकांबरोबर बोलायचेही नाहीत. गुमराहनंतर त्या दोघांनी पुन्हा कधीच स्क्रीन शेअर केली नाही.

हेही वाचा>> नाना पाटेकरांवर जिवापाड प्रेम करायची मनीषा कोईराला, अभिनेत्याला दुसऱ्या अभिनेत्रीबरोबर रुममध्ये पाहिलं अन्…; नेमकं काय घडलं होतं?

नेमकं काय घडलं होतं?

श्रीदेवींच्या चाहत्यांपैकी संजय दत्त एक होता. फिल्मफेअरने दिलेल्या माहितीनुसार, श्रीदेवी यांना भेटण्यासाठी संजय दत्त अनेकदा त्यांच्या सेटवर जायचा. खुद्द अभिनेत्यानेच याबाबत खुलासा केला होता. १९९३ साली हिंमतवाला चित्रपटाचं शूटिंगदरम्यान संजय दत्त श्रीदेवी यांना भेटण्यासाठी सेटवर गेला होता. परंतु, सेटवर श्रीदेवी दिसल्या नाहीत. त्यामुळे संजय दत्त थेट त्यांच्या मेकअप रुमपर्यंत जाऊन पोहोचला.

हेही वाचा>> “आमच्या पोटावर पाय…” शुबमन गिलच्या ‘त्या’ व्हिडीओवर आयुष्मान खुरानाची कमेंट, क्रिकेटर रिप्लाय देत म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजय दत्त त्यावेळी दारुच्या नशेत होता. संजय दत्तला अशा अवस्थेत पाहून श्रीदेवी घाबरल्या आणि त्यांनी अभिनेत्याच्या तोंडावरच मेकअप रुमचा दरवाजा बंद केला. त्यानंतर संजय दत्तबरोबर काम करण्याचा निर्णय श्रीदेवींनी घेतला होता. परंतु, करिअरसाठी त्यांना गुमराह चित्रपटात संजय दत्तबरोबर स्क्रीन शेअर करावी लागली.