Stree 2 Director Apologized : बॉलीवूडच्या सध्याच्या काही लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये श्रद्धा कपूरचं (Shraddha Kapoor) नाव आवर्जून घेतलं जातं. २०१० मध्ये आलेल्या ‘तीन पत्ती’मधून तिने बॉलीवूडमध्ये एन्ट्री घेतली आणि त्यानंतर एकाहून एक अधिक हिट चित्रपट देत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. गेल्यावर्षी आलेल्या श्रद्धाच्या ‘स्त्री २’ (Stree 2) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. तिच्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. या चित्रपटाचे दिग्दर्शक अमर कौशिक (Amar Kaushik) आहे. दोघांमधील मैत्रीचीही खूप चर्चा आहे. पण अलीकडेच अमरने श्रद्धाबद्दल असे विधान केले की, अभिनेत्रीचे चाहते चांगलेच संतापले.

‘स्त्री’ चित्रपटाचे आतापर्यंत दोन भाग प्रदर्शित झाले आहेत आणि दोन्हीही चित्रपट सुपरहिट झाले आहेत. अशातच चित्रपटाचे दिग्दर्शक अमर कौशिकने श्रद्धाला या चित्रपटात का घेतले हे सांगितले. शिवाय यावेळी त्याने श्रद्धाच्या हास्याची तुलना चेटकिणीशी केली. यामुळे श्रद्धाचे चाहते त्याच्यावर संतापले. कोमल नाहटा यांच्याशी झालेल्या संभाषणात, अमर कौशिकने सांगितलं की, “श्रद्धाला चित्रपटात कास्ट करण्याचे संपूर्ण श्रेय दिनेश विजान यांना जाते. तो फ्लाइटमध्ये श्रद्धा कपूरला भेटला होता. तर त्याने मला सांगितले अमर, श्रद्धा अगदी ‘स्त्री’सारखी हसते, म्हणजेच चेटकीणसारखी हसते, माफ कर श्रद्धा.”

अमर कौशिकच्या मुलाखतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि त्याने अभिनेत्रीबद्दल केलेल्या या वक्तव्याबद्दल श्रद्धाचे अनेक चाहते त्याच्यावर संतापले आहेत. अमरने श्रद्धाबद्दल केलेलं हे वक्तव्य तिच्या अनादरपणाचं आहे आणि हे खूपच चूक आहे असं म्हणत नेटकऱ्यांनी व श्रद्धाच्या चाहत्यांनी त्याला ट्रोल केलं. तर काहींनी श्रद्धाची बाजू घेत हे तिचं नैसर्गिक हास्य आहे. ती काही उगाच करत नाहीअसं म्हटलं आहे. यादरम्यान, नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात त्याने श्रद्धासमोरच माफी मागितली.

‘मॅडॉक फिल्म्स’ला २० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त नुकतीच एक खास पार्टी आयोजित करण्यात आली होती. तेव्हा श्रद्धा व अमर यांनी एकत्र हजेरी लावली. यावेळी अमरने सर्वांसमोर श्रद्धाची माफी मागितली. त्याने स्वत:चे कान पकडत श्रद्धाबद्दल केलेल्या चेटकीण या वक्तव्याची माफी मागितली. या पार्टीसाठी त्यांनी एकत्र फोटोही काढले. सोशल मीडियावर या जोडीचे अनेक फोटो व व्हिडीओ व्हायरल होत आहेत, ज्यात त्यांचा खास बॉण्ड दिसत आहे. अमरने हा किस्सा अगदी गंमतीत सांगितला होता. पण तरी श्रद्धाच्या चाहत्यांना तो खटकला.

View this post on Instagram

A post shared by F I L M Y G Y A N (@filmygyan)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमरने श्रद्धाबद्दलची केलेली ती कमेंट चाहत्यांना आवडली नाही. त्यामुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. पण यामुळे श्रद्धा व अमर यांच्या नात्यात काहीच फरक पडला नसल्याचे सध्या व्हायरल व्हिडीओवरुन दिसत आहे. दरम्यान, श्रद्धाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर काही वृत्तांनुसार, श्रद्धा ‘तुंबाड’च्या दिग्दर्शक राही अनिल बर्वे आणि दिग्दर्शक मोहित सुरी यांच्याबरोबर लवकरच काही चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे म्हटलं जात आहे.