इन्फोसिस फाऊंडेशनच्या संस्थापिका सुधा मूर्तींचे विचार अनेकांना आवडतात. त्या उत्तम लेखिका, समासेविका आणि शिक्षिका आहेत. भारतीय चित्रपटांवर असलेले प्रेम सुधा मूर्तींनी अनेकदा व्यक्त केले आहे. अलीकडेच कुणाल विजयकर यांना दिलेल्या मुलाखतीत सूधा मूर्तींनी त्यांना आवडत्या कलाकारांविषयी भाष्य केले.

हेही वाचा : “बार्बी भारतीय असती तर?”, बायको मिताली मयेकरच्या व्हिडीओवर सिद्धार्थ चांदेकरने केली खास कमेंट; म्हणाला, “लगीन करायचंय…”

कुणाल विजयकरने मुलाखतीत सुधा मूर्तींना त्यांच्या आवडत्या अभिनेत्यांविषयी प्रश्न विचारला. यावेळी त्या म्हणाल्या, “दिलीप कुमार, राजेश खन्ना, हृतिक रोशन, शाहरुख खान, आमिर खान या सगळ्यांचे काही विशिष्ट चित्रपट मला खूप आवडले.” तसेच पुढे त्यांनी “मला आयुष्मान खुरानाचे चित्रपटही आवडतात.”, असे नमूद केले.

हेही वाचा : Bigg Boss OTT : ‘वेड’ फेम अभिनेत्री जिया शंकरच्या ‘त्या’ कृतीवर सलमान खान भडकला; म्हणाला, “साबणाचे पाणी प्यायला देऊन…”

महिला कलाकारांविषयी बोलताना सुधा मूर्ती म्हणाल्या, “१९५८ मध्ये मी पहिला चित्रपट पाहिला होता. तेव्हापासून मी वैजंतीमाला यांची चाहती आहे. अलीकडच्या आलिया भट्ट मला चांगली अभिनेत्री वाटते. मी सहसा चित्रपटगृहांमध्ये रडत नाही. परंतु, राझी चित्रपटात आलियाचा अभिनय पाहून मी रडले…ती खरोखरच चांगली अभिनेत्री आहे.”

हेही वाचा : Video : “तुझी लायकी नाही फक्त सैफमुळे…”, इब्राहिम अली खानची वागणूक पाहून नेटकरी संतापले, व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“प्रत्येक चित्रपटाचा मी फार गांभीर्याने विचार करते. अनेकदा चित्रपटातील संगीत, दिग्दर्शन, संपादन याचा मी बारकाईने विचार करते. असेही सुधा मूर्ती यांनी सांगितले. दरम्यान, मेघना गुलजार दिग्दर्शित ‘राझी’ चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता विकी कौशल यांनी प्रमुख भूमिका साकारली होती.