क्रिकेटपटू केएल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी यांचा विवाह सोहळा पार पडला आहे. खंडाळा येथील फार्म हाऊसमध्ये दोघांचं लग्न झालं. त्यांचं लग्न झाल्याची माहिती अभिनेत्रीचे वडील सुनील शेट्टी यांनी दिली. सुनील शेट्टी व मुलगा अहान शेट्टी यांनी पापाराझींना मिठाई वाटली आणि अथियाचं लग्न पार पडल्याची माहिती दिली.

फक्त ४ चित्रपटांत दिसलेली अथिया शेट्टी आहे कोट्यवधींची मालकीण; जाणून घ्या तिची व केएल राहुलची एकूण संपत्ती किती?

यावेळी सुनील शेट्टी यांनी कुर्ता आणि पारंपारिक दागिने घातले होते. तर, अहान पांढऱ्या रंगाच्या ट्रेडिशनल कपड्यांमध्ये दिसला. अहानने मिठाई वाटली आणि नंतर बाप-लेकांनी फोटोसाठी पोज दिल्या. यावेळी सुनील शेट्टी यांनी अथिया व राहुल यांच्या रिसेप्शनबद्दलही माहिती दिली. आयपीएल झाल्यानंतर त्यांचं रिसेप्शन होईल, असं सुनील शेट्टींनी सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फार्म हाऊसबाहेर मीडियाशी संवाद साधताना सुनील शेट्टी म्हणाले, “खूप सुंदर आणि लहानसा सोहळा होता. खूप जवळचे कुटुंबीय हजर होते. लग्नाचा सोहळा छान झाला. फेरेही झाले आणि लग्न अधिकृतपणे झालंय. आता मी सासरा झालो आहे.” रिसेप्शनबद्दल विचारले असता ते आयपीएल नंतर होईल, असं त्यांनी सांगितलं.