सनी देओल बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. तीन दशकांमध्ये सनी देओलने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. सनी देओलचा काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘गदर २’ने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई केली होती. आता सनी देओल हा नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपटात हनुमानाची भूमिका साकारणार असल्याची माहिती समोर आली आहे. या भूमिकेसाठी सनीने मोठी रक्कम आकारल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा- तब्बल २० वर्षांनी येणार ‘खाकी’चा सीक्वल; अमिताभ बच्चन व तुषार कपूरसह दुसऱ्या भागात कोण झळकणार? जाणून घ्या

‘रामायण’ चित्रपटात सनी देओलला ‘हनुमान’च्या भूमिकेसाठी कास्ट करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार- हनुमानाच्या भूमिकेसाठी सनीने ४५ कोटी इतकी रक्कम आकारल्याचे सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी त्याने ‘रामायण’शी निगडित चित्रपटात काम करण्याची इच्छाही व्यक्त केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘रामायण’ चित्रपटात रणबीर कपूर श्रीरामांची भूमिका साकारणार आहे; तर दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी सीतेच्या भूमिकेसाठी आलिया भट्टच्या नावाची चर्चा सुरू होती; पण काही कारणास्तव तिने या चित्रपटातून काढता पाय घेतला आहे. ‘केजीएफ’फेम अभिनेता यश रावणाची भूमिका साकारणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. ‘रामायण’ चित्रपट २०२४ मध्ये प्रदर्शित होणार आहे.