अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण अडीच वर्षांनी पुन्हा एकदा चर्चेत आलंय. या प्रकरणावरून राज्य सरकार आणि विरोधक पुन्हा एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंनी सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्तीला ‘AU’ नावाने ४४ कॉल आल्याचं लोकसभेत सांगितलं. ‘AU’ म्हणजे आदित्य ठाकरे, असा दावा राहुल शेवाळेंनी केल्याने एकच खळबळ उडाली होती. अशातच सुशांतच्या शवविच्छेदनावेळी हजर असलेल्या एका व्यक्तीने धक्कादायक दावा केला आहे. सुशांतने आत्महत्या केली नव्हती, तर त्याचा खून करण्यात आला होता, असं या व्यक्तीने म्हटलंय.

“शिझानने माझ्या मुलीला लग्नाचं आमिष दाखवलं अन्…”; तुनिषाच्या निधनानंतर आईचा आक्रोश

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
Salman Khan shooting case accused was found after calling the brother
सलमान खान गोळीबार प्रकरण : भावाला दूरध्वनी केल्यामुळे आरोपी सापडले
father beaten
वसई : मुलीचे अपहरण केल्यानंतर पित्याला बेदम मारहाण, नया नगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा
chhota rajan marathi news, 213 burglary marathi news
कुख्यात डॉन छोटा राजनच्या घरासह, २१३ घरफोड्या करणाऱ्यास अटक

कूपर हॉस्पिटलमध्ये सुशांत सिंग राजपूतचे पोस्टमॉर्टम करणारे रूपकुमार शाह यांनी हा दावा केला आहे. ते म्हणाले, “सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाला तेव्हा आमच्याकडे ५ ते ६ मृतदेह शवविच्छेदनासाठी आले होते. त्यामध्ये एक आत्महत्या केलेला व्हीआयपी मृतदेह आला होता. जेव्हा तो मृतहेद शवविच्छेदन करण्यासाठी टेबलवर घेतला तेव्हा, तो सुशांतसिंह राजपूतचा असल्याचं कळलं. सुशांतच्या अंगावर मारहाणीच्या खुणा आणि गळ्यावर दोन व्रण होते, हातापायवर मार लागून तुटल्यासारख्या खुणा होत्या. त्याची व्हिडीओ शूटींग करायला हवी होती, असं आमचं म्हणणं होतं. पण अधिकाऱ्यांनी फक्त फोटो काढायला सांगितलं. आम्ही आमच्या वरिष्ठांना सांगितलं की, ही हत्याच वाटत आहे. त्यापद्धतीने त्यावर काम करावं, पण वरिष्ठ म्हणाले तत्काळ शवविच्छेदन करुन मृतदेह द्यायचा आहे,” असा दावा शाह यांनी केला आहे.

“व्हॅनिटी व्हॅनमध्ये…” तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीने उपस्थित केला प्रश्न

“गळफास घेतेलल्या आणि खून झालेल्या मृतदेहात खूप फरक असतो. त्याच्या गळ्यावरती असलेले व्रण हत्या केल्यासारखे दिसत होते. अंगावर मारहाणीचे व्रण दिसत होते. असे व्रण हा आत्महत्या करण्यात आलेल्या व्यक्तीच्या अंगावर नसतात,” असंही शाह यांनी टीव्ही ९ शी बोलताना म्हटलंय.

“ती मुलगी माझी…” तुनिषा शर्माच्या आत्महत्येवर कथित बॉयफ्रेड शिझानच्या आईची प्रतिक्रिया

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जुन २०२० रोजी वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरा आत्महत्या केलेल्या अवस्थेत आढळला होता. मुंबई पोलीस, ईडी, सीबीआय आणि एनसीबी या सर्व तपास यंत्रणांनी या प्रकरणाची चौकशी केली होती. चौकशीअंती सुशांतची हत्या नाही, तर आत्महत्याच होती, असा निर्णय अधिकाऱ्यांनी दिला होता.