Sushmita Sen Car Collection : मिस युनिव्हर्स व लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्री सुश्मिता सेनचे जगभरात चाहते आहेत. आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या सुश्मिताच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहित आहे. सुश्मिता सेनची घरं, तिची एकूण संपत्ती, उत्पन्नाचे स्रोत याबद्दल आपण जाणून घेऊयात.
सुश्मिता सेनचे घर मुंबईतही आहे आणि दिल्लीतही आहे. मुंबईतील वर्सोवा येथे तिचं सी-फेसिंग आलिशान अपार्टमेंट आहे. सुश्मिता सेनचं बालपण दिल्लीत गेलं. दिल्लीतील वसंत कुंज येथे सुश्मिता सेनचं स्वतःचं घर आहे.
सुश्मिता सेनचे कार कलेक्शन
सुश्मिता सेनला आलिशान गाड्यांची खूप आवड आहे. तिच्याजवळ १.४३ कोटी रुपयांची BMW7 सीरिज 730Ld आहे. त्याचबरोबर तिच्याजवळ ऑडी Q7, BMW X6, लेक्सेस LX470 अशा लक्झरी गाड्यांचे कलेक्शन आहे.
सुश्मिता सेनची संपत्ती
फायनान्शियल एक्सप्रेसमधील एका वृत्तानुसार, सुश्मिता सेनची एकूण संपत्ती ७४ कोटी रुपये आहे. ती दरवर्षी अंदाजे ९ कोटी रुपये कमावते आणि दर महिन्याला जवळपास ६० लाख रुपये कमावते.
सुश्मिता सेनचे उत्पन्नाचे स्रोत
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, सुश्मिता सेन एका चित्रपटासाठी ३ ते ४ कोटी रुपये मानधन घेते. ब्रँड एंडोर्समेंटसाठी ती १.५ कोटी रुपये आकारते. त्याचबरोबर २००५ मध्ये सुश्मिताने एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुरू केली होती. सुश्मिता सेनचं Bangali Mashi’s Kitchen नावाचं एक रेस्टॉरंट देखील होतं, जे आता बंद झालं आहे.
सुश्मिता सेनचे वैयक्तिक आयुष्य
सुश्मिता सेनचा जन्म १९ नोव्हेंबर १९७५ रोजी हैदराबादमध्ये एका बंगाली कुटुंबात झाला. तिचे वडील भारतीय हवाई दलात विंग कमांडर होते. तिची आई ज्वेलरी डिझायनर आहे आणि दुबईमध्ये दागिन्यांचे दुकान आहे. सुश्मिता सेनने लग्न केलेलं नाही. तिला दोन मुली आहेत. त्या दोघींनाही सुश्मिताने दत्तक घेतलं होतं. दोन्ही मुली सुश्मिताबरोबरच राहतात. सुश्मिताला राजीव सेन नावाचा भाऊ आहे, तो व्यावसायिक आहे.
