बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेनला गेल्याच महिन्यात हृदयविकाराचा झटका आला होता. अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती चाहत्यांना दिली होती. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर अँजिओप्लास्टीही करण्यात आल्याचं सुश्मिताने सांगितलं होतं. यातून बरे होत असल्याचं सुश्मिता म्हणाली होती. याबाबत आता सुश्मिताचा सहकलाकार विकास कुमारने खुलासा केला आहे.

विकासने नुकतीच ‘नेटवर्क १८’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने ‘आर्या ३’च्या शूटिंगदरम्यानच सेटवर सुश्मिताला हृदयविकाराचा झटका आल्याचं म्हटलं आहे. विकास म्हणाला, “आम्ही जोधपूरमध्ये ‘आर्या ३’ वेब सीरिजमधील काही अॅक्शन सीन्सचं शूटिंग करत होतो. याचदरम्यान सुश्मिताला हृदयविकाराचा झटका आला होता. सेटवर शूटिंगदरम्यान सुश्मिताची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर काही मेडिकल टेस्ट करण्यात आल्या. तेव्हा सुश्मिताला हृदयविकाराचा झटका आल्याचं समजलं.”

हेही वाचा>> उर्फी जावेदबाबत महिला नेत्याची प्रतिक्रिया, अभिनेत्रीचा ‘तो’ व्हिडीओ पाहून म्हणाल्या, “तिचे कपडे…”

हेही वाचा>> “३० एप्रिलला सलमान खानची हत्या करू”, बॉलिवूडच्या भाईजानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी

“सुश्मिताला हृदयविकाराचा झटका आल्याचं टीममधील कोणालाच माहीत नव्हतं. तिला स्वत:लाही याबाबत काहीही माहिती नव्हती. मेडिकल टेस्टच्या रिपोर्टनंतर सुश्मिताला याबाबत कळलं. पण तिने हृदयविकाराचा झटका आल्याचं कोणालाही सांगितलं नव्हतं. सुश्मिताच्या पोस्टमधूनच तिला हृदयविकाराचा झटका आल्याचं आम्हाला समजलं. सुश्मिताला याबाबत कोणत्याही प्रकारचा ड्रामा करायचा नव्हता, म्हणून तिने कोणालाही सांगितलं नाही,” असंही पुढे विकास म्हणाला.

हेही वाचा>> सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीकडून रिया चक्रवर्तीचा ‘वेश्या’ म्हणून उल्लेख? ‘ते’ ट्वीट व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘आर्या’ ही सुश्मिताची गाजलेली वेब सीरिज आहे. या वेब सीरिजचे दोन सीझन प्रदर्शित झाले असून तिसऱ्या सीझनचं शूटिंग सुरू आहे. सुश्मिता सेन ‘आर्या’मध्ये मुख्य भूमिकेत आहे. तर अभिनेता विकास कुमार या वेब सीरिजमध्ये एसीपी युनूस खानची भूमिका साकारत आहे.