बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने समाजवादी पार्टीचा नेता फहाद अहमदशी ६ जानेवारीला कोर्ट मॅरेज केलं. स्वराने ट्वीटरवरुन व्हिडीओ शेअर करत याची माहिती चाहत्यांना दिली. स्वराच्या लग्नाच्या बातमीने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. चाहत्यांसह बॉलिवूडमधील सेलिब्रिटींनी स्वरा व फहादला शुभेच्छा दिल्या आहेत.

स्वरा भास्कर व फहाद अहमदच्या लग्नाची बातमी समजताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही ट्वीट केलं आहे. आव्हाडांनी स्वरा व फहादला नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. जितेंद्र आव्हाडांनी स्वरा व फहादचा फोटो शेअर केला आहे. “माझ्या मित्राचं खूप अभिनंदन. तुम्हाला सुखी आयुष्य लाभो”, असं म्हणत आव्हाडांनी फहाद अहमद व स्वरा भास्करला ट्वीटमध्ये टॅगही केलं आहे.

हेही वाचा>> रिसेप्शन सोहळ्यातील कियारा अडवाणीचा नेकलेस आहे खूपच खास; हिरव्या रंगाच्या एका खड्याची किंमत ऐकून थक्क व्हाल

हेही वाचा>> ‘बिग बॉस’चा विजेता झाल्यानंतर एमसी स्टॅनला लॉटरी; अ‍ॅमेझॉनसह मिळाल्या २० ब्रँडच्या ऑफर

स्वराने कोर्ट मॅरेज केल्यानंतर गुरुवारी(१६ फेब्रुवारी) फहाद अहमदशी साखरपुडा केला. मार्च महिन्यात पारंपरिक पद्धतीने लग्न करणार असल्याचं स्वराने म्हटलं आहे. स्वरा व फहादच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. स्वरा व फहादची पहिली भेट डिसेंबर २०१९ मध्ये एका आंदोलनादरम्यान झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. प्रेमाच्या शोधात असलेल्या स्वरा व फहादला एकमेकांमध्ये चांगले मित्र भेटले. त्यानंतर भेटीगाठी वाढत गेल्या आणि त्यांच्यातील मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.त्यानंतर तीन वर्षांनी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. फहादशी लग्नगाठ बांधत स्वराने नवीन आयुष्याची सुरुवात केली आहे.

हेही वाचा>> “आदिल मुस्लीम आहे म्हणून कितीही लग्न करु शकतो, पण…”, तिहेरी तलाकचा उल्लेख करत राखी सावंत म्हणाली “मोदीजी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असणाऱ्या स्वराने आजवर अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. स्वराचा पती फहाद एक सामाजिक कार्यकर्ता आहे. फहाद सीएएविरोधी आंदोलनात सहभागी झाला होता. समाजवादी पार्टीचा तो युवा नेता आहे.