प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने फहाद अहमदशी लग्न केलं आहे. कोर्ट मॅरेजनंतर स्वरा भास्करने हळदी-मेहेंदी, कव्वाली नाईट आणि रिसेप्शन सोहळ्याचं आयोजनही केलं. दरम्यान, स्वराने जेव्हापासून फहाद अहमदशी लग्न करणार असल्याची घोषणा केली आणि कोर्ट मॅरेजची माहिती दिली, तेव्हापासून तिला सातत्याने ट्रोल केलं जात आहे. अशातच विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी पुन्हा एकदा स्वरावर निशाणा साधला.

“मुलगा हवाय की मॉलमधील ऑफर?” लग्नासाठी अवाजवी अटी ठेवणाऱ्या मुलींना सोनाली कुलकर्णीने सुनावलं; म्हणाली, “ऐशोआराम पाहिजे तर…”

स्वराने पती फहाद अहमदबरोबरचा एक फोटो ट्वीट केला होता. तो फोटो कव्वाली नाइटमधील होता. या फोटोमध्ये स्वरा व फहादने गडद हिरव्या रंगाचे ट्रॅडिशनल कपडे परिधान केले होते. स्वराने हा फोटो शेअर करत ‘हॅलो शौहर’ असं कॅप्शन दिलं होतं.

स्वराचं हेच ट्वीट रिट्वीट करत साध्वी प्राची यांनी ‘काही अंदाज? फ्रीज की सुटकेस’ असं ट्वीट केलं होतं. पण हे ट्वीट नेटकऱ्यांना फारसं रुचलेलं दिसत नाही. त्यांच्या या ट्वीटवर युजर्सनी साध्वी प्राची यांच्यावर संताप व्यक्त केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘तुमच्या अशा विचारांवर चिड येते’, ‘तुमचं दुकान अशा ट्रोलिंगमुळेच सुरू आहे’, ‘तुम्ही पण काय विचारताय? द्वेष पसरवून तुम्ही इतकं तर नक्कीच कमावलं असेल की नविवाहित जोडप्याला सूटकेस आणि फ्रीज दोन्हीही गिफ्ट करू शकाल’, ‘नवविवाहित जोडप्याला पाहून तुम्ही इतकं जळताय? तुम्ही स्वतःला साध्वी म्हणता का?’ अशा प्रकारच्या कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.