scorecardresearch

“तुला लाज वाटली पाहिजे” तापसी पन्नूने घातलेल्या नेकलेसमुळे नेटकरी संतापले; नेमकं कारण काय?

तापसी पन्नूने नुकतंच लॅक्मे फॅशन वीकमध्ये तिच्या रॅम्प वॉकदरम्यान गळ्यात हा नेकलेस घातला होता

taapsee pannu trolled for necklace
फोटो : सोशल मीडिया

तापसी पन्नू ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तापसी ही वेगवेगळ्या कारणांमुळे सतत चर्चेत असते. तापसी पन्नू ही सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत आहे. तिच्या अभिनयाची लोक प्रशंसा करतात, पण तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे तिला बरंच ट्रोलही केलं जातं. आता पुन्हा एकदा तापसी ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली. तिने शेअर केलेल्या एका फोटोमुळे सोशल मीडियावर तिला चांगलंच ट्रोल केलं जात आहे.

तापसी पन्नूने नुकतंच लॅक्मे फॅशन वीकमध्ये तिच्या रॅम्प वॉकदरम्यान गळ्यात एक नेकलेस परिधान केला होता. मात्र या नेकलेसमुळेच ती अडचणीत सापडली आहे. तापसीने परिधान केलेल्या हारामध्ये लक्ष्मीची मूर्ती स्पष्टपणे दिसत आहे. तापसीने हा नेकलेस लाल रंगाच्या डिप नएक लेहेंग्यासह घातलेला पाहून नेटकरी चांगलेच संतापले आणि त्यांनी तापसीवर देवीचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. काही मिनिटांतच तापसी पन्नूच्या सोशल मीडिया पोस्टवर संतप्त आणि आक्षेपार्ह कमेंटचा दिसू लागल्या.

आणखी वाचा : MTV Roadies 19 : “तुमच्यातल्या रोडीला जागं करा”, धुमाकूळ घालायला येतोय ‘रोडीज’चा नवा सीझन

“तुला थोडीतरी लाज वाटते का?” अशा शब्दांत नेटकऱ्यांनी तापसीला खडेबोल सुनावले आहेत. आपण कोणते कपडे परिधान करतोय आणि त्याबरोबर दागिने निवडताना आपण एखाद्या धर्माचा अपमान करत नाही हे ध्यानात यायला हवं असं काही युझर्सनी म्हंटलं आहे. फॅशन वीकमध्ये तापसी पन्नूने परिधान केलेले कपडे खूपच बोल्ड होते आणि तिने लक्ष्मीच्या मूर्तीला हार घालून कित्येकांच्या भावनांचा अपमान केला आहे असे युजर्सचे मत आहे. तापसीच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या फोटोंवर लोक संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.

comments on taapsee post
comments on taapsee post

गेल्या काही दिवसांत तापसीचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकलेले नाहीत. तिच्या आगामी चित्रपटासाठी सगळेच उत्सुक आहेत. तापसी खुद्द शाहरुख खानबरोबर ‘डंकी’ या चित्रपटात झळकणार आहे. याबरोबरच ‘हसीन दिलरुबा’ चित्रपटाचा पुढचा भागही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-03-2023 at 11:55 IST

संबंधित बातम्या