अजय देवगणच्या ‘दृश्यम २’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई केली. ‘दृश्यम २’ला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं. आता अजयच्या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अजयचा ‘भोला’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या चित्रपटाचा दुसरा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘भोला’च्या टीझर लाँच सोहळ्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आणखी वाचा – शाहरुख खानचा ‘पठाण’ प्रदर्शित होताच बॉलिवूडवर भडकली कंगना रणौत, म्हणाली, “चित्रपटसृष्टीचा दर्जा…”

अजयच्या या चित्रपटामध्ये तब्बूही मुख्य भूमिकेमध्ये काम करताना दिसणार आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये तब्बूचा डॅशिंग लूक पाहायला मिळाला. ‘भोला’च्या टीझर लाँच सोहळ्याला तब्बू व अजयने एक एण्ट्री केली. यावेळी दोघंही अगदी खूश दिसत होते. पण यावेळी तब्बूने केलेलं कृत्य चर्चेचा विषय ठरत आहे.

पाहा व्हिडीओ

अजय व तब्बू या टीझर लाँच सोहळ्यामध्ये उपस्थितांशी संवाद साधत होते. यावेळी तब्बूने अजयला तिच्याजवळ खेचलं आणि गालाला किस केलं. यादरम्यानचे दोघांचे व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अजय व तब्बूमध्ये किती चांगली मैत्री आहे हे पुन्हा एकदा या व्हिडीओच्या माध्यमातून दिसून आलं आहे.

आणखी वाचा – उर्फी जावेदचा चेहराच बदलला, झाली अशी अवस्था की फोटो शेअर करताच नेटकऱ्यांनीही उडवली खिल्ली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजय व तब्बू यांच्यामध्ये अगदी घट्ट मैत्री आहे. या दोघांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्रित काम केलं. काही मुलाखतींमध्ये अजयसह तब्बूनेदेखील त्यांच्या मैत्रीबाबत भाष्य केलं होतं. दृश्यम, गोलमाल अगेन, दे दे प्यार दे, विजयपथ सारख्या चित्रपटांमध्ये अजय व तब्बूने एकत्र काम केलं आहे.