अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या तिचा आगामी चित्रपट ‘लस्ट स्टोरी २’ मुळे चांगलीच चर्चेत आली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तमन्नाने ‘नो किसिंग पॉलिसी’चा नियम मोडला आहे. १८ वर्षांच्या करिअरमध्ये अभिनेत्रीने पहिल्यांदाच ‘लस्ट स्टोरीज २’ चित्रपटामध्ये बोल्ड आणि इंटिमेट सीन शूट केले आहेत.

हेही वाचा- अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी देवेंद्र फडणवीसांची मोठी अपडेट; म्हणाले, “पुरावे विश्वासार्ह…”

‘लस्ट स्टोरी’मधल्या बोल्ड सीन्स तसेच संवादांची बरीच चर्चा रंगली होती. चित्रपटाच्या दुसऱ्या भागातही इंटिमेट सीन्स पाहायला मिळणार असल्याचं ट्रेलरवरुन लक्षात येत आहे. या ट्रेलरमध्ये तमन्ना भाटिया व विजय वर्मा यांचा इंटिमेट सीन पाहायला मिळत आहे. चित्रपटातील बोल्ड सीन्सबाबत बोलताना तमन्नाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिने ‘लस्ट स्टोरी २’ बघताना अचानक खोलीत कुणी आले तर काय करायचं? यावर उत्तर दिलं आहे.

हेही वाचा- महेश भट्ट यांच्याशी लग्न करण्याचा आलिया भट्टच्या आईला होता पश्चाताप, सावत्र लेक पूजाचा मोठा खुलासा

तमन्ना भाटिया म्हणाली ‘लस्ट स्टोरीज २’ बघताना जर कोणी अचानक खोलीत आले तर घाबरून जाण्याची किंवा चित्रपट बंद करण्याची गरज नाही. कारण या चित्रपटात केवळ वासना नाही तर त्याशिवाय आणखी बरंच काही आहे. जसे की नाटक, आईचे प्रेम, आजीचे प्रेम आहे. या चित्रपटाच्या नावावर जाऊ नका. हा चित्रपट सगळयांना दाखवा. कारण चित्रपट बघितल्यामुळे आभाळ फुटणार नाही, किंवा वादळ येणार नाही.”

View this post on Instagram

A post shared by Netflix India (@netflix_in)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चित्रपटात तमन्ना आणि विजय काजोल, नीना गुप्ता, तिलोत्तमा शोम, मृणाल ठाकूर, तमन्ना भाटिया, अमृता सुभाष, विजय वर्मा, कुमुद मिश्रा, अंगद बेदी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. येत्या १९ जूनला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.