दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तमन्नाच्या लग्नाच्या चर्चा सर्वत्र सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. तमन्ना लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे तमन्नाचे चाहतेही याबद्दल उत्सुक आहेत. तमन्नाने तिच्या लग्नाबद्दलच्या चर्चांवर उत्तर देत स्वत:च खुलासा केला आहे.

तमन्ना लग्न करणार असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून रंगल्या आहेत. विरल भय्यानी या पापाराझींच्या इन्स्टाग्राम पेजवरुन तमन्नाचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. या व्हिडीओमध्ये तमन्ना हिरव्या रंगाची साडी नेसून ग्लॅमरस लूकमध्ये दिसत आहे. या व्हिडीओला त्यांनी “तमन्ना भाटिया एका व्यावसायिकाशी लग्न करणार आहे?”, असं कॅप्शन दिलं होतं. तमन्नाने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर करत “खरंच?” असं कॅप्शन लिहून इमोजी पोस्ट केले आहेत.

हेही वाचा >> नेहा धुपियाने शेअर केला सेमीन्यूड फोटो, टॉवेल घेतलेला टॉपलेस बोल्ड लूक व्हायरल

हेही वाचा >> Video: दीड महिन्यांपूर्वी आईला गमावलं, आता वडिलांना शेवटचा निरोप देताना महेश बाबूला अश्रू अनावर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पापाराझींच्या या प्रश्नाला व लग्नाच्या चर्चांना तमन्नाने दुसरी स्टोरी शेअर करत उत्तर दिलं आहे. या स्टोरीमध्ये तमन्नाने तिच्या होणाऱ्या व्यावसायिक पतीचा फोटो शेअर केला आहे. तमन्नाचा हा होणारा नवरा दुसरा-तिसरा कोणी नसून तिचाच पुरुष वेशातील फोटो आहे. जीन्स, टी-शर्ट, जॅकेटबरोबर मुलासारखे छोटे केस व मिशी लावलेला तमन्नाचा फोटो तिने स्टोरी मध्ये पोस्ट केला असून “माझ्या व्यावसायिक पतीची ओळख करुन देत आहे” असं कॅप्शन देऊन तिने हसण्याचे इमोजी पोस्ट केले आहेत. त्यामुळे तमन्नाच्या लग्नाच्या चर्चा या केवळ अफवा असल्याचं समोर आलं आहे.

Tamannaah bhatia marriage rumours

‘बाहुबली’ चित्रपटातून प्रसिद्धी मिळवलेल्या तमन्नाने ‘एन्टरटेन्मेंट’, ‘हिंमतवाला’, ‘रिबेल’ अशा हिट चित्रपटातून अभिनयाचा ठसा उमटवला. ‘बबली बाऊन्सर’ हा तिचा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. ‘प्लॅन ए प्लॅन बी’ चित्रपटात ती रितेश देशमुखसह स्क्रीन शेअर करताना दिसली होती.