Aishwarya Rai Abhishek Bachchan : ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा काही वर्षांपासून सुरू आहेत. या जोडप्यानं २००७ मध्ये एकमेकांशी लग्नगाठ बांधली. मात्र, त्याआधी दोघांनीही एकत्र काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यातील ‘कुछ ना कहो’ हा चित्रपट तुफान गाजला होता. चाहते आजही हा चित्रपट फार आवडीनं पाहतात. अशात याच चित्रपटात त्यांच्याबरोबर काम केलेल्या एका अभिनेत्रीनं ऐश्वर्या आणि अभिषेकच्या स्वभावावर वक्तव्य करीत एक खुलासा केला आहे.

‘कुछ ना कहो’ हा चित्रपट साल २००७ मध्ये प्रदर्शित झाला. त्यामध्ये अभिनेत्री तनाज इराणीनं एक सहायक कलाकार म्हणून काम केलं होतं. नुकतीच या अभिनेत्रीनं दिलेल्या एका मुलाखतीत या चित्रपटाच्या आठवणी आणि ऐश्वर्या-अभिषेकचे स्वभाव कसे आहेत, याबद्दलची माहिती दिली आहे.

हेही वाचा : १० वर्षांनंतर म्हाळसा आली परत! अभिनेत्री सुरभी हांडेची ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत एन्ट्री

दोघांचे स्वभाव अगदी विरुद्ध : तनाज इराणी

मुलाखतीमध्ये तनाज इराणी म्हणाली, “चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी सेटवर अभिषेक नेहमी मस्तीच्या मूडमध्ये असायचा. तो सतत काही ना काही करामती करायचा. तर, ऐश्वर्या कायम शालीन आणि शांत असायची. ती तिच्या कामाकडे गांभीर्यानं लक्ष द्यायची. ऐश्वर्या आणि अभिषेक दोघांचे स्वभाव एकमेकांच्या अगदी विरुद्ध आहेत.”

तनाज इराणीनं पुढे चित्रपटाच्या शूटिंगचा एक किस्सा सांगितला, “मी सेटवर येण्याआधी अभिषेक सतत मस्ती आणि वेगवेगळे प्रँक करायचा. नंतर मी आले आणि आम्ही सर्वांनी मिळून एका सीनच्या शूटिंगवेळी त्याच्याबरोबर प्रँक करायचं ठरवलं. त्यानंतर अभिषेक आणि माझ्यात चांगली मैत्री झाली. अभिषेक ही फार चांगली व्यक्ती आहे.”

तसेच पुढे या अभिनेत्रीनं ऐश्वर्या रायबरोबर स्क्रीन शेअर करण्याचा अनुभवसुद्धा सांगितला. “मी ऐश्वर्याबरोबर दोन चित्रपटांत स्क्रीन शेअर केली आहे. ऐश्वर्या कायम तिच्या कामावर लक्ष केंद्रित करते. ती अत्यंत हुशार आणि सुंदर मुलगी आहे. ऐश्वर्या दिसायलासुद्धा फार सुंदर आहे. ती अगदी एका बाहुलीसारखी आहे असं माला वाटतं.”

हेही वाचा : ‘दबंग’ रिलोडेड लाइव्ह कॉन्सर्टसाठी सलमान खान सज्ज; म्हणाला, “स्टेजवर जाण्याआधी कपडे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ऐश्वर्या आणि अभिषेकच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा सुरू असताना काल एका कार्यक्रमात दोघेही एकत्र दिसले. त्यात ऐश्वर्यानं घेतलेल्या एका सेल्फीमध्ये अभिषेकसुद्धा आहे. या दोघांचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. चाहते या दोघांना एकत्र पाहून सुखावले आहेत.