बहुचर्चित ‘द केरला स्टोरी’ चित्रपट ५ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटावरून सध्या अनेक आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. परंतु, असे असतानाही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड करत आहे. प्रदर्शनानंतर अवघ्या १२ दिवसांतच ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाने १५० कोटींचा आकडा पार केला आहे.

हेही वाचा- ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाच्या निर्मात्यांची मोठी घोषणा; धर्मांतराच्या जाळ्यातून बाहेर पडलेल्या महिलांसाठी ‘एवढ्या’ लाखांची करणार मदत

सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला असून या चित्रपटावर अनेक राज्यांमध्ये बंदीही घालण्यात आली आहे. तरीही बॉक्स ऑफिसवर चित्रपट कोटींची कमाई करत असल्याचं पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने अवघ्या नऊ दिवसांत १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केली. मात्र, प्रदर्शनाच्या १४ व्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत घट झालेली दिसून आली आहे. चित्रपटाच्या १४ व्या दिवशीच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.

हेही वाचा- “मी खूप स्वार्थी होतो, नेहमी तिच्याशी…”; पहिल्या प्रेमाबाबत नवाजुद्दीन सिद्दिकीचा मोठा खुलासा, म्हणाला…

‘सैकनिल्क’च्या ट्रेण्ड रिपोर्टनुसार, ‘द केरला स्टोरी’ने गुरुवारी म्हणजेच १४ व्या दिवशी ६.५० कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. चित्रपटाने आत्तापर्यंत एकूण १७१.०९ कोटींची कमाई केली आहे. लवकरच ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट २०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

‘द केरला स्टोरी’ हा २० ते ३० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला चित्रपट आहे. हा २०२३ मधील दुसरा सर्वात मोठा हिट चित्रपट ठरला आहे. विशेष म्हणजे, ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाने सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ आणि रणबीर कपूरच्या ‘तू झुठी मैं मक्कार’चे कलेक्शन रेकॉर्ड तोडले आहेत.