‘द केरला स्टोरी’ फेम अभिनेत्री अदा शर्मा सध्या चांगलीच चर्चेत आहे. ‘द केरला स्टोरी’मध्ये अदाने शालिनी उन्नीकृष्णन ही मुख्य भूमिका साकारली होती. यापूर्वी अदाने अनेक हिंदी, तमिळ, तेलगू आणि मल्याळम् चित्रपटांमध्ये काम केले होते, परंतु ‘द केरला स्टोरी’ चित्रपटामुळे अभिनेत्रीला एक वेगळी ओळख मिळाली आहे. चित्रपटाने अवघ्या १८ दिवसांमध्ये २०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केल्याने अदाने अलीकडेच सिद्धार्थ कन्ननच्या शोमध्ये हजेरी लावली होती. या वेळी अदाने वडिलांच्या निधनानंतरही ती रडली नव्हती याबाबत खुलासा केला आहे.

हेही वाचा : Cannes 2023 : कान्सच्या रेड कार्पेटवर भारतीय पेहराव का केला? सारा अली खानने सांगितले कारण, म्हणाली…

अदाला या वेळी तू खऱ्या आयुष्यात कोपऱ्यात एकटी बसून कधी रडली आहेस का, असा प्रश्न विचारण्यात आला याला उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली, “मी माझ्या खऱ्या आयुष्यात कधीही रडले नाही; कारण कधीच कोणत्याही गोष्टीवर मी रिअ‍ॅक्ट करत नाही. मला खूप राग आला तरीही मी शांतपणे गोष्टी हाताळते…माझा स्वभाव असाच आहे. माझ्या वडिलांचे निधन झाल्यावर मी अजिबात रडले नव्हते. मी पूर्णपणे शॉकमध्ये होते…मला काय करू तेच कळत नव्हते. त्यांच्या जाण्याने मला खूप मोठा धक्का बसला होता; कारण सकाळी वृत्तपत्र वाचताना अचानक त्यांचा तोल गेला.”

हेही वाचा : Video: प्रसिद्ध अभिनेत्याने रणबीर कपूरच्या लोकप्रिय गाण्यावर स्कर्ट घालून केला डान्स; व्हिडीओ व्हायरल

अदा पुढे म्हणाली, एवढेच काय मी माझे प्रेमही व्यक्त करू शकत नाही. मला माहितीये ही सवय खूप वाईट आहे पण, मी मुळातच खूप कमी रिअ‍ॅक्ट करते.” अदाचा हा व्हिडीओ तिने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला असून यावर तिच्या चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया येत असून यामध्ये ते तिला, “अदा तू खऱ्या आयुष्यात रिअ‍ॅक्ट करीत जा…” असा सल्ला देत आहेत.

हेही वाचा : “राम सिया राम…” ‘आदिपुरुष’ चित्रपटातील नवे गाणे ऐकून प्रेक्षक म्हणाले “आम्ही धन्य झालो…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाला मिळालेल्या चांगल्या यशानंतर अदा शर्मा लवकरच मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे. ‘द गेम ऑफ गिरगिट’या चित्रपटातून ही नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.