तीन दशकांहून जास्त काळापासून सिनेसृष्टीत विविधांगी भूमिका साकारून या अभिनेत्रीने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. तिने आतापर्यंत अनेक सुपरस्टार्सबरोबर काम केलं आहे. इतक्या वर्षांपासून इंडस्ट्रीत सक्रिय असलेल्या या अभिनेत्रीने पन्नाशी ओलांडली असली तरी आताही ती दमदार भूमिका करतेय. या अभिनेत्रीने एका अभिनेत्याची आई, प्रेयसी व पत्नी अशा तिन्ही भूमिका केल्या होत्या. कोण आहे ही अभिनेत्री? जाणून घेऊयात.

रुपेरी पडद्यावर काही वर्षे काम करून नंतर या झगमगटापासून दूर जाणाऱ्या अनेक अभिनेत्री आपण पाहिल्यात. पण काही अभिनेत्री मात्र या इंडस्ट्रीत स्वतःचं भक्कम स्थान निर्माण करून टिकून राहिल्या. पडद्यावर विविध भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्री फक्त बॉलीवूडच नव्हे तर दाक्षिणात्य इंडस्ट्रीतही अभिनेत्री म्हणून सुपरहिट सिनेमे दिले आहेत. ही अभिनेत्री म्हणजे तब्बू होय.

अभिनेत्री तब्बूने तमिळ चित्रपटसृष्टीत खूप काम केलं आहे. ‘कंडुकोंडेन कंडुकोंडेन’ चित्रपटात अजितबरोबरचे तिचे रोमँटिक सीन्स खूप चर्चेत राहिले होते. तब्बूने वयाच्या ११ व्या वर्षी चित्रपटांमध्ये अभिनय करायला सुरुवात केली. तिचा पहिला चित्रपट १९८२ साली आलेला ‘बाजार’ होतात. ती १४ वर्षांची असताना तिचा दुसरा चित्रपट आला होता. या दोन्हीमध्ये तिने बालकलाकार म्हणून काम केलं होतं.

तब्बूने सर्वात आधी तेलुगू चित्रपटात हिरोईन म्हणून काम केलं होतं. तिने अभिनेता वेंकटेशसोबत ‘कुली नंबर १’ या चित्रपटातून पदार्पण केले. त्या चित्रपटाच्या यशाने तब्बूला बॉलीवूडमध्ये आणलं. तिला संजय कपूरबरोबर ‘प्रेम’ चित्रपटातून लाँच केलं जाणार होतं, पण तो चित्रपट उशीरा रिलीज झाला. १९९४ मध्ये रिलीज झालेल्या ‘पहला पहला प्यार’ चित्रपटातून तब्बू बॉलीवूडमध्ये हिरोईन झाली. ‘विजयपथ’मध्ये अजय देवगणबरोबर काम करून तिने हिट चित्रपट दिला.

सुपरस्टार्सबरोबर तब्बूने केलं काम

तब्बूने नंतर दोन दशकांपेक्षा जास्त काळ मुख्य अभिनेत्री म्हणून बॉलीवूड व दाक्षिणात्य चित्रपट गाजवले. तिने अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, अजय देवगण, मोहनलाल, अजीतसारख्या आघाडीच्या सर्व अभिनेत्यांबरोबर काम केलं. पण एका अभिनेत्याची आई, पत्नी व प्रेयसी अशा ३ भूमिका तिने केल्या आहेत. हा अभिनेता म्हणजे नंदमुरी बालकृष्णा. बलैया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदमुरी बालकृष्णाबरोबर तब्बूने बरेच तेलुगू चित्रपट केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Tabu (@tabutiful)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तब्बू व नंदमुरी बालकृष्णा यांच्या तीन चित्रपटांपैकी एक म्हणजे व्ही.व्ही. विनायक दिग्दर्शित ‘चेनकेशव रेड्डी’ हा चित्रपट आहे. २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात बलैयाने दुहेरी भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटात तब्बूने बलैयाच्या दुहेरी पात्रांची आई आणि पत्नीची भूमिका साकारली होती. तसेच तब्बूने राघवेंद्र राव दिग्दर्शित ‘पांडुरंगडू’ या बायोपिकमध्ये अभिनेता बालकृष्णच्या प्रेयसीची भूमिका साकारली आहे.